जिल्ह्यात काेराेनाची लस घेण्यात ज्येष्ठ नागरिकच आघाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 05:00 IST2021-03-14T05:00:00+5:302021-03-14T05:00:32+5:30
सुरुवातीच्या कालावधीत काेराेना लसविषयी गैरसमज हाेते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक लस घेण्यास तयार हाेत नव्हते. आता मात्र या लसविषयी असलेला गैरसमज दूर झाला आहे. त्यामुळे लस घेणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. शहरी साेबतच ग्रामीण भागातीलही नागरिक लस घेत आहेत. तसेच ४५ ते ५९ वयाेगटातील ३७५ जणांनी ही लस घेतली आहे. गडचिराेली येथील दाेन खासगी रुग्णालयांमध्येही लसीकरणाला सुरुवात झाली आहे.

जिल्ह्यात काेराेनाची लस घेण्यात ज्येष्ठ नागरिकच आघाडीवर
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : काेराेनाची लस घेण्यास जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक सरसावले असून, शनिवारपर्यंत सुमारे १ हजार ५३९ नागरिकांनी लस घेतली. इतर वयाेगटातील आजारी नागरिकांपेक्षाही लस घेण्यात ज्येष्ठ नागरिकच पुढे आहेत.
सुरुवातीच्या कालावधीत काेराेना लसविषयी गैरसमज हाेते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक लस घेण्यास तयार हाेत नव्हते. आता मात्र या लसविषयी असलेला गैरसमज दूर झाला आहे. त्यामुळे लस घेणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. शहरी साेबतच ग्रामीण भागातीलही नागरिक लस घेत आहेत. तसेच ४५ ते ५९ वयाेगटातील ३७५ जणांनी ही लस घेतली आहे. गडचिराेली येथील दाेन खासगी रुग्णालयांमध्येही लसीकरणाला सुरुवात झाली आहे. त्याही ठिकाणी चांगला प्रतिसाद दिसून येत आहे. शनिवारपर्यंत जिल्ह्यात ३८ केंद्रांवर लस दिली जात हाेती. साेमवारपासून ५४ केंद्र सुरू हाेतील, अशी माहिती आराेग्य विभागाने दिली आहे.
तरुणांपेक्षा ज्येष्ठ एक पाऊल पुढे
सुरुवातीच्या कालावधील आराेग्य विभाग, पाेलीस, पंचायत विभागातील नागरिकांना लस दिली जात हाेती. शरीराने धष्टपुष्ट असलेले कर्मचारी लस घेण्यास धजावत नव्हते. नंबर लागूनही लस घेण्यास जात नव्हते. अजूनही अनेकांनी लस घेतली नाही. ज्येष्ठ नागरिक मात्र स्वत:हून लस घेण्यास पुढे येत आहेत. स्वत: रुग्णालयात जाऊन नाेंदणी करून लस घेत आहेत.
महिलांचाही पुढाकार
ज्येष्ठ नागरिकांमध्ये पुरुषांबराेबरच महिलाही लस घेत असल्याचे दिसून येत आहे. लस घेणाऱ्या एकूण नागरिकांमध्ये महिलांची संख्या निम्मी आहे. पती व पत्नी दाेघेही लस घेत आहेत.
१५ हजार लस उपलब्ध
शुक्रवारी गडचिराेली जिल्ह्याला पुन्हा १५ हजार लस उपलब्ध झाल्या आहेत. आतापर्यंत जिल्ह्याला एकूण ५४ हजार लस उपलब्ध झाल्या हाेत्या. त्यापैकी २३ हजार लस देण्यात आल्या आहेत, तर ३१ हजार लस शिल्लक आहेत.