ज्येष्ठ नागरिक व गुणवंतांचा सत्कार

By Admin | Updated: February 28, 2016 01:36 IST2016-02-28T01:36:26+5:302016-02-28T01:36:26+5:30

येथील सोनार समाज बांधवांच्या वतीने संत नरहरी महाराज पुण्यतिथी कार्यक्रम शनिवारी घेण्यात आला.

Senior citizen and quality honors | ज्येष्ठ नागरिक व गुणवंतांचा सत्कार

ज्येष्ठ नागरिक व गुणवंतांचा सत्कार

संत नरहरी पुण्यतिथी : वैरागडात सोनार समाजाच्या वतीने कार्यक्रम
वैरागड : येथील सोनार समाज बांधवांच्या वतीने संत नरहरी महाराज पुण्यतिथी कार्यक्रम शनिवारी घेण्यात आला. या निमित्ताने समाजातील ज्येष्ठ नागरिक आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल, श्रीफळ देऊन विजय खापरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी गोपालकाला व महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुरूदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष महादेव दुमाने होते. यावेळी भंडारेश्वर समितीचे अध्यक्ष डोनूजी कांबळे, तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष संगीता मेश्राम, दत्तू सोमनकर, ग्रा.पं. सदस्य नामदेव धनकर, प्रा. प्रदीप बोडणे, विलास खापरे, श्यामसुंदर खरवडे आदी उपस्थित होते. याप्रसंगी शामराव डुंबरे, जयराज खरवडे, दिवाकर खरवडे, आनंदराव डुंबरे, निखिल डुंबरे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन अविनाश खरवडे यांनी तर आभार नकुल डुंबरे यांनी मानले. कार्यक्रमाला गजानन हर्षे, विनोद डुंबरे, रघुनाथ हर्षे, वसंत काळबांधे, मोहन खरवडे, नीलेश हर्षे, मधुकर उदापुरे, होमराज उदापुरे, शंकर खरवडे, शरद डुंबरे, अक्षय खरवडे आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Senior citizen and quality honors