सीआरपीएफतर्फे बियाणे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 05:00 IST2020-06-25T05:00:00+5:302020-06-25T05:00:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क धानोरा : लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांनासुद्धा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. सध्या खरीप हंगामाला सुरूवात झाली आहे. हंगामात ...

Seed distribution by CRPF | सीआरपीएफतर्फे बियाणे वाटप

सीआरपीएफतर्फे बियाणे वाटप

ठळक मुद्दे११३ बटालीयनचा पुढाकार : सावरगाव येथे अनेक शेतकऱ्यांना लाभ

लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांनासुद्धा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. सध्या खरीप हंगामाला सुरूवात झाली आहे. हंगामात बियाणे, खते व अन्य निविष्ठा खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक चणचण भासत आहे. अशास्थितीत नक्षलग्रस्त सावरगाव येथे सीआरपीएफ ११३ बटालीयनच्या वतीने शेतकऱ्यांना धान बियाण्यांचे वाटप करण्यात आले.
धानोरा तालुक्यातील सावरगाव परिसरात धान पेरणीला सुरूवात झाली आहे. अनेक शेतकऱ्यांकडे धान बियाणे नसल्याने ते चिंताग्रस्त आहेत. अशास्थितीत सीआरपीएफ ११३ बटालीयनच्या वतीने मदतीचा हा पुढे करण्यात आला. नक्षलग्रस्त सावरगाव येथे धान बियाण्यांसह मका बियाण्यांचे वाटप करण्यात आले. याचा लाभ अनेक शेतकऱ्यांना झाला. सीआरपीएफ बटालीयनचे कमांडंट जी. डी. पंढरीनाथ यांच्या मार्गदर्शनात शेतकऱ्यांना बियाण्यांचे वाटप करण्यात आले.
नक्षलग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धान बियाणे वाटप करण्यात आले. या भागातील शेतकरी कोणत्याही अडचणीत राहू नये, यासाठी सीआरपीएफच्या वतीने यापुढेही मदतीचा हात दिला जाईल, असे प्रतिपादन कमांडंट जी. डी. पंढरीनाथ यांनी केले.
यावेळी सहायक कमांडंट धनराज तसेच सीआरपीएफ जवान उपस्थित होते.

Web Title: Seed distribution by CRPF

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती