शिवसेनेचे विचार घराघरात पाेहाेचवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:26 IST2021-07-16T04:26:07+5:302021-07-16T04:26:07+5:30
शिवसेना पक्षाच्या वतीने १२ ते २४ जुलैपर्यंत शिवसेना जनसंपर्क मोहीम राबविण्यात येत आहे. या माेहिमेचा शुभारंभ आरमोरी येथील दुर्गा ...

शिवसेनेचे विचार घराघरात पाेहाेचवा
शिवसेना पक्षाच्या वतीने १२ ते २४ जुलैपर्यंत शिवसेना जनसंपर्क मोहीम राबविण्यात येत आहे. या माेहिमेचा शुभारंभ आरमोरी येथील दुर्गा मंदिर सभागृहातून करण्यात आला. याप्रसंगी ते बाेलत हाेते. कार्यक्रमाला उपजिल्हाप्रमुख अविनाश गेडाम, अरविंद कात्रटवार, पंचायत समितीचे माजी सभापती चंद्रशेखर मने, जिल्हा परिषदेच्या माजी महिला व बालकल्याण सभापती वेणू ढवगाये, युवा सेनेचे माजी जिल्हाप्रमुख चंदू बेहरे, आरमोरी येथील नगर परिषदेचे बांधकाम सभापती सागर मने, नगरसेवक माणिक भोयर आदी उपस्थित होते. याप्रसंगी अरविंद कात्रटवार म्हणाले, शिवसेना पक्षाचे विचार घराघरात पोहोचविण्यासाठी शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते तयार आहेत. फक्त त्यांना प्राेत्साहन देणे व सहकार्याची गरज आहे.
याप्रसंगी उपस्थित पदाधिकाऱ्यांनीही मनाेगत व्यक्त केले. आरमोरी तालुक्यातील जि.प. व पं.स. गणानुसार संपूर्ण तालुक्यात ही मोहीम २४ जुलैपर्यंत राबविली जाणार आहे. ॲड. विजय चाटे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून आभार मानले.