सलग दुसऱ्या वर्षीही ग्रामीण भागातील मुलांच्या पारंपरिक खेळांवर आले विरजण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:36 IST2021-04-21T04:36:24+5:302021-04-21T04:36:24+5:30
प्रत्येकांनी सुट्या कशा घालवायच्या याचे नियोजन केलेले असते कुणी कॉम्प्युटर, कोणी टायपिंग तर कोणी इतर क्षेत्रात करिअर करण्यासाठी या ...

सलग दुसऱ्या वर्षीही ग्रामीण भागातील मुलांच्या पारंपरिक खेळांवर आले विरजण
प्रत्येकांनी सुट्या कशा घालवायच्या याचे नियोजन केलेले असते कुणी कॉम्प्युटर, कोणी टायपिंग तर कोणी इतर क्षेत्रात करिअर करण्यासाठी या सुट्यांची वाट पाहत असतो तर लहान मुलं पोहणे, खेळणे, तर कोणी मामाच्या गावाला जाऊन मज्जा करून या सुट्या घालवायच्या, याचा बेत आखतात. पण कोरोनाने सर्वांच्या नियोजित आनंदावर सलग दुसऱ्या वर्षीही पाणी फेरले आहे. ही महामारी दिवसेंदिवस आपली पकड आणखीन मजबूत करत आहे. यावर प्रतिबंध घालण्यासाठी शासन जिकरीचे प्रयत्न करत आहेि. कोरोनाला आळा घालण्यासाठी शासनाने लॉकडाऊन करून सर्वाना घरात बसण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे सर्व कामे घरातूनच करा, असे आदेशही शासकीय कर्मचारी व इतर नाेकरवर्गांना दिली आहेत. गर्दी करू नका, काम नसेल तर घराबाहेर पडू नका व वेळोवेळी हात साबणाने धुवा आणि आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, असे सांगितले आहे .
जिथे घराबाहेर जाणे शक्य नाही तिथे मित्रांबरोबर फिरणे खेळणे शक्य आहे का, या महामारीने लहान, थोरांचा आनंद उद्ध्वस्त केला आहे, मग कसले खेळणे अन कसले पोहणे. जो तो आपल्या ताणतणावात वावरत आहे. पण लहान निरागस मुलांना या महामारीचे काय गांभीर्य ! त्यांच्या सर्व आनंदावर पाणी फिरले आहे. यात बिचाऱ्या लहान मुलांचा आनंदही लॉकडाऊन झाला आहे. मुले घरात बसून आहेत म्हणून घरातील मंडळी त्यांच्या आपापसातील खोड्यांमुळे तंग झाली आहेत. टीव्हीचा आवाज कमी- जास्त करणे बातम्या व मालिका बघू न देणे़, घरातील काम वाढवून ठेवणे. नुसती कटकट झाली आहे म्हणून आई आणि वडिलांची किटकिट होत आहे. कधी हे कोरोनाचे संकट जाईल अन् कधी या बंदिस्त घरातून बाहेर पडेल, असे सर्वांनाच वाटत आहे. तरीसुध्दा ग्रामीण भागातील मुले आपले नेहमीचे खेळ खेळत असतात. पण तेही मर्यादित स्वरूपात. खरेच बाहेर मुक्तपणे पडावे असे जर वाटत असेल तर शासनाने दिलेल्या सूचनांचे आपण सर्वांनी जर काटेकोरपणे पालन केले तर या वैश्विक महामारीवर आपण मात करून या कोरोनाला आपण हद्दपार करू शकतो.