दुसऱ्या लाटेत मुले ठरताहेत काेराेनाचे टार्गेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:36 IST2021-03-26T04:36:58+5:302021-03-26T04:36:58+5:30
मृत्युदर कमी दुसऱ्या लाटेत काेराेना रुग्णांची संख्या वाढत असली तरी मृत्युदर मात्र अतिशय कमी असल्याचे दिसून येते. पहिल्या लाटेदरम्यान ...

दुसऱ्या लाटेत मुले ठरताहेत काेराेनाचे टार्गेट
मृत्युदर कमी
दुसऱ्या लाटेत काेराेना रुग्णांची संख्या वाढत असली तरी मृत्युदर मात्र अतिशय कमी असल्याचे दिसून येते. पहिल्या लाटेदरम्यान काेराेनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १०६ एवढी हाेती. मागील दाेन महिन्यांच्या कालावधीत केवळ ३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ही थाेडी दिलासादायक बाब आहे. सध्या जिल्हाभरात अतिशय गतीने नागरिक व कर्मचाऱ्यांचे लसीकरण हाेत आहे. यामुळे सामूहिक राेगप्रतिकारकशक्ती तयार हाेऊन रुग्णांची संख्या कमी हाेईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नागरिक बिनधास्तच
ज्या वेळी जिल्ह्यात काेराेनाचा रुग्ण नव्हता त्या वेळी काेराेनाविषयी प्रचंड भीती हाेती. त्यामुळे नागरिक बाहेर पडताना विशेष काळजी घेत हाेते. आता मात्र फारशी काळजी घेताना दिसून येत नाहीत. केवळ दंड वाचविण्यासाठी नागरिक चाैकाजवळ पाेहाेचल्यानंतर मास्क घालतात. एरवी मास्क घालत नाहीत.
दुसऱ्या लाटेत काेराेनाचे एकूण रुग्ण १,१७२
० ते १५ - १०४
१६ ते ३० - ३६०
३१ ते ५० - ४४६
५१ च्या वर २६५