हुडूकदुम्मातील दुसरा बंधाराही वाहून गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 06:00 IST2019-09-02T06:00:00+5:302019-09-02T06:00:24+5:30

हुडूकदुम्मा येथे १० लाख ७२ हजार ८३७ रुपये खर्च करून बंधारा बांधण्यात आला. हुडूकदुम्मा हे गाव कोरचीपासून पूर्वेस २५ किमी अंतरावर आहे. या गावात कोणत्याही प्रकारच्या सिंचनाच्या सुविधा नाहीत.

The second port of Hudukdumma was also carried away | हुडूकदुम्मातील दुसरा बंधाराही वाहून गेला

हुडूकदुम्मातील दुसरा बंधाराही वाहून गेला

ठळक मुद्देदर्जावर प्रश्नचिन्ह : १८ लाखांचा खर्च व्यर्थ

लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची : मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने जलयुक्त शिवार अभियानांतर्गत तालुक्यातील हुडूकदुम्मा येथे दोन बंधारे बांधण्यात आले. पहिला बंधारा वाहून गेल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित केले. अधिकची माहिती घेतल्यानंतर या गावातील दुसराही बंधारा पहिल्याच पावसाने वाहून गेल्याची बाब उजेडात आली आहे.
हुडूकदुम्मा येथे १० लाख ७२ हजार ८३७ रुपये खर्च करून बंधारा बांधण्यात आला. हुडूकदुम्मा हे गाव कोरचीपासून पूर्वेस २५ किमी अंतरावर आहे. या गावात कोणत्याही प्रकारच्या सिंचनाच्या सुविधा नाहीत. त्यामुळे सदर गावात सिंचन सुविधा निर्माण होण्यासाठी बारमाही वाहणाऱ्या नाल्यावर बंधारा बांधण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली. प्रशासकीय यंत्रणेनेही बंधारा बांधण्याला सकारात्मक प्रतिसाद दर्शविला. हुडूकदुम्मा येथील सदर नाल्यावर मागील पाच वर्षात चार बंधारे बांधण्यात आले. पाच वर्षापूर्वी वन विभागाने बंधारा बांधला. दोन वर्षापूर्वी सिंचन विभागाने बंधारा बांधला. हे दोन्ही बंधारे योग्यस्थितीत आहेत. परंतु चार महिन्यापूर्वी बांधलेले गावातील दोन्ही बंधारे पावसाच्या पाण्याुळे वाहून गेले. बंधारे तुटफूट झाल्याने अवस्था बिकट झाली. सदर दोन्ही बंधारा बांधकामासाठी एकूण २१ लाख ४५ हजार ६७४ रुपयांचा खर्च आला. मात्र अल्पावधीतच हे बंधारे पहिल्याच पावसात वाहून गेल्याने शासनाचे लाखो रुपये व्यर्थ गेले आहे.
दोन्ही सिमेंट नाला वाहून गेले. बंधाºयाचे काम निकृष्ट करणाºया कंत्राटदार व अभियंत्यावर कारवाई करावी, अशी मागणी महाग्रामसभेचे सचिव नरेंद्र सलामे, ग्रामसभा अध्यक्ष बल्लुराम हिचामी, सरपंच कल्पना नैताम यांनी केली आहे.

दुरूस्ती करणार
वृत्त प्रकाशित होताच विभागाचे कनिष्ठ अभियंता पेंदोरकर व कंत्राटदार बब्बू मस्तान बंधाºयाच्या ठिकाणी पाहणीसाठी आले. देखभाल दुरूस्तीचा कालावधी पाच वर्ष असून दुरूस्तीसाठी १० टक्के निधी राखीव आहे. पाऊस कमी झाल्यावर बंधाºयाची दुरूस्ती करण्यात येईल, अशी माहिती अभियंत्यांनी दिली.

Web Title: The second port of Hudukdumma was also carried away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.