विज्ञाननिष्ठा वाढीला लागली
By Admin | Updated: February 28, 2016 01:32 IST2016-02-28T01:32:59+5:302016-02-28T01:32:59+5:30
गडचिरोलीसारख्या मागास जिल्ह्यात सातत्त्याने गेल्या काही वर्षांपासून शाळा, तालुका, जिल्हा स्तरांवर विज्ञान प्रदर्शनांचे आयोजन होत असल्याने बाल वयापासून

विज्ञाननिष्ठा वाढीला लागली
राष्ट्रीय विज्ञान दिन : प्रयोगांचा मानवी जीवनात प्रत्यक्ष उपयोग
गडचिरोली : गडचिरोलीसारख्या मागास जिल्ह्यात सातत्त्याने गेल्या काही वर्षांपासून शाळा, तालुका, जिल्हा स्तरांवर विज्ञान प्रदर्शनांचे आयोजन होत असल्याने बाल वयापासून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानविषयक जाणीव जागृती मोठ्या प्रमाणावर निर्माण होऊन त्यांची विज्ञाननिष्ठा वाढीस लागली आहे. दरवर्षी नवनवीन प्रतिकृती तयार करून त्यांच्यातील विज्ञान विषयक दृष्टिकोन व्यापक होत आहे.
भौतिक शास्त्रज्ञ चंद्रशेखर व्यंकटरमण यांना ‘रमन प्रभाव’ (रमन इफेक्ट) या संशोधनाकरिता १९३० मध्ये भौतिक शास्त्रातील नोबेल प्राप्त झाले. भौतिक शास्त्रातील त्यांच्या योगदानाबद्दल २८ फेब्रुवारी हा दिवस ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ म्हणून देशभर साजरा केला जातो. यानिमित्ताने विविध प्रयोगशील उपक्रम व कार्यक्रम साजरे होतात.
जिल्ह्यात तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीतून विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टीला वाव देण्याचे काम दरवर्षी केले जात आहे. यात महत्त्वपूर्ण भूमिका गटशिक्षणाधिकाऱ्यांची आहे. जिल्ह्यात संपूर्ण तालुक्यात विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन केले जाते. त्यानंतर प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या प्रतिकृतींना जिल्हास्तरीय प्रदर्शनीत सहभागी केल्या जात आहे. जिल्हास्तरीय प्रदर्शनीसाठी शिक्षण विभागाच्या वतीने दोन लाख रूपयांचा निधी उपलब्ध केला जातो. यातून विद्यार्थ्यांची निवास व्यवस्था तसेच इतर व्यवस्थेवर भर दिला जातो. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाची आवड निर्माण व्हावी व तो स्वयंप्रेरणेने प्रयोगशील प्रतिकृती सादर करावा, याकरिता जिल्ह्यात दरवर्षी प्रदर्शनींचे आयोजन केले जाते.(शहर प्रतिनिधी)