विज्ञान समाजाभिमुख करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 00:14 IST2017-12-28T00:13:33+5:302017-12-28T00:14:03+5:30

विज्ञान मानवला मानवाला गरीबी व बिमारीपासून वाचवू शकते, तसेच मानवाची सामाजिक अशांती समाप्त करू शकते, त्यामुळे विज्ञान समाजाभिमुख करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन आ. कृष्णा गजबे यांनी केले.

Science is socially oriented | विज्ञान समाजाभिमुख करा

विज्ञान समाजाभिमुख करा

ठळक मुद्देआमदारांचे प्रतिपादन : कुरखेडात तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : विज्ञान मानवला मानवाला गरीबी व बिमारीपासून वाचवू शकते, तसेच मानवाची सामाजिक अशांती समाप्त करू शकते, त्यामुळे विज्ञान समाजाभिमुख करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन आ. कृष्णा गजबे यांनी केले.
स्थानिक श्रीराम विद्यालय तथा उच्च महाविद्यालयात शिक्षण विभाग पंचायत समिती कुरखेडाच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीच्या कार्यक्रमात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पं.स. उपसभापती मनोज दुनेदार होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प. सदस्य नाजूक पुराम, गीता कुमरे, संस्थाध्यक्ष वामनराव फाये, सचिव दोषहर फाये, प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर, प्राचार्य सुरेश रेवतकर, विलास गावंडे, शाळा समिती सदस्य चांगदेव फाये, पं.स. सदस्य कविता गुरनुले, नगरसेवक प्रा. नागेश्वर फाये, प्राचार्य पी.डब्ल्यू. भरणे, कुरखेडा पं.स.चे संवर्ग विकास अधिकारी पी.एस. मरस्कोल्हे, केंद्रप्रमुख रामचंद्र मुंगमोडे, डी.डी. झरकर, भास्कर नवघडे, प्राचार्य कवाडकर आदी उपस्थित होते.
याप्रसंगी प्राचार्य डॉ. नरेंद्र आरेकर यांनी विज्ञान, अध्यात्म व वैज्ञानिक वास्तविकता यावर प्रकाश टाकला, सुरेश रेवतकर यांनी आरोग्य आणि सदृढ आरोग्याबाबत मार्गदर्शन केले. आध्यात्मिकेतूनच विज्ञानाची निर्मिती झाली आहे, असे वामनराव फाये यांनी सांगितले. यावेळी मनोज दुनेदार यांनींही मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक पी.एम. शिवणकर, संचालन प्रा. विनोद नागपुरकर यांनी केले तर आभार शिक्षण विस्तार अधिकारी यू.एन. राऊत यांनी मानले. यावेळी विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: Science is socially oriented

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.