शहीद जवानाला साश्रूनयनांनी मानवंदना

By Admin | Updated: May 5, 2017 01:07 IST2017-05-05T01:07:34+5:302017-05-05T01:07:34+5:30

भामरागड तालुक्यातील कोठी मार्गावरील हेमलकसा ते कारमपल्ली या गावादरम्यान टेकला क्रॉसींगवर नक्षल्यांनी घडवून आणलेल्या...

Savantanayana sahananadana martyr | शहीद जवानाला साश्रूनयनांनी मानवंदना

शहीद जवानाला साश्रूनयनांनी मानवंदना

गडचिरोली : भामरागड तालुक्यातील कोठी मार्गावरील हेमलकसा ते कारमपल्ली या गावादरम्यान टेकला क्रॉसींगवर नक्षल्यांनी घडवून आणलेल्या भूसुरूंग स्फोटात भूसुरूंगरोधक वाहन उडाले. यामध्ये सुरेश लिंगा तेलामी हा पोलीस जवान शहीद झाला. या शहीद पोलीस जवानाला गुरूवारी दुपारी गडचिरोली येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर २१ तोफांची सलामी देऊन मानवंदना अर्पण करण्यात आली.
यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर, अतिरिक्त पोलीस महासंचालक कनकरत्नम, १९२ केंद्रीय राखीव पोलीस दलाचे पोलीस महानिरिक्षक राजकुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल, अप्पर जिल्हाधिकारी महेश आव्हाड, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर यांच्यासह शहीद सुरेश तेलामी यांची पत्नी, लहान मुलगा, आई व इतर नातेवाईक उपस्थित होते. पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी शहीद परिवाराची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. शासनातर्फे सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Savantanayana sahananadana martyr