शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

तस्करांकरिता रेतीघाट मोकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 1:21 AM

तालुक्यातील वैनगंगा नदीवरील बाम्हणी व सुकळी (देव्हाडी) रेतीघाट महसूल प्रशासनाने पुन्हा मोकाट सोडल्याचे दिसत आहे. घाट लिलाव नसतांना दोन्ही रेती घाटातून रेतीचे अवैध सर्रास उत्खनन सुरु आहे. सध्या दोन्ही रेतीघाटावर रेतीचा अवैध साठा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तालुक्यातील वैनगंगा नदीवरील बाम्हणी व सुकळी (देव्हाडी) रेतीघाट महसूल प्रशासनाने पुन्हा मोकाट सोडल्याचे दिसत आहे. घाट लिलाव नसतांना दोन्ही रेती घाटातून रेतीचे अवैध सर्रास उत्खनन सुरु आहे. सध्या दोन्ही रेतीघाटावर रेतीचा अवैध साठा आहे. येथे महसूल प्रशासन कुणाच्या दडपणाखाली आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. केवळ कार्यालयात बसून कागदोपत्री कामे करण्यात येथील महसूल प्रशासन मग्न दिसत आहे. नवनियुक्त पालकमंत्री तथा जिल्हाधिकारी येथे धडक कारवाई करणार काय, असा प्रश्न नागरिकांनी केला आहे.तुमसर तालुक्यातून वैनगंगा नदी वाहते. येथील रेतीला प्रचंड मागणी नागपूरात आहे. तालुक्यातील बाम्हणी व सुकळी रेतीघाट रेती तस्करांना सध्या वरदान ठरला आहे. राजरोसपणे येथे रेतीचे उत्खनन सुरु आहे. नदी काठावर झाडाच्या आडोसात रेती साठा करण्यात आला आहे. तेथून यंत्राने ती ट्रकमध्ये भरली जाते. त्यानंतर ट्रकने रेती वाहतूक केली जाते. नदी पात्रात ट्रॅक्टर नेले जातात. बाम्हणी येथे सुमारे १५ ट्रॅक्टर नदीपात्रातून काठावर आणतात. हा नित्यक्रम दिवसभर व पहाटेपासून सुरु आहे.गुरुवारी ब्राम्हणी रेतीघाट दिवसभर बंद होता. पुन्हा गुरुवारी सकाळी येथून ट्रक रेती घेऊन रवाना झाले. तुमसरपासून बाम्हणी केवळ चार किमी अंतरावर आहे. तर सुकळी (दे) रेती घाट आठ किमी अंतरावर आहे. सदर रेतघाटांची तक्रार केल्यावरही महसूल प्रशासन येथे दखल घेत नाही. महसूल प्रशासनाचे तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, उपविभागीय अधिकारी अशी साखळी तुमसर तालुक्यात आहे. दिवसाढवळ्या नदी घाटावर रेतीचे टिप्पर रेती भरीत आहेत. ट्रॅक्टर नदीपात्रात राजरोसपणे मजूराकडून भरले जात आहेत. रेती घाट तस्करांकरिता मोकळे सोडण्याचे कारण अद्याप सर्वसामान्यांना समजले नाही. येथे केवळ दबावापोटी कारवाई होत नाही.राज्य शासनाने वरिष्ठ अधिकारी एवढे दडपणाखाली वावरण्यामागील कारण कोणते हा संशोधनाचा विषय आहे. महसूल प्रशासनाचा येथे धाक उरला नाही. रेती तस्कर मुजोर झाले आहेत. नदी काठावरील गावागावांत रेती तस्करांची टोळके तयार झाले आहेत. त्याची मुजोरी व दादागीरी वाढली आहे. येथे पुढे स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.राज्य शासनाच्या लाखोंचा महसूल मागील काही महिन्यांपासून बुडत आहे. गावातील वातावरण दूषित होत आहे. शासकीय मालमत्तेची लूट सुरु असताना कर्तव्य बजावणारे अधिकारी केवळ उघड्या डोळयाने बघत आहेत. एवढी लाचारी पत्करण्याची कारणे कोणती अशी चर्चा सध्या तालुक्यात सुरु आहे. महसुल प्रशासनाची किमान पत सांभाळण्याची येथे गरज आहे.भंडाराचे पालकमंत्री परिणय फुके व नव्याने रुजू होणारे जिल्हाधिकारी नरेश गीते यांनी किमान शासकीय मालमत्तेची लुट थांबविण्याकरिता प्रयत्न करावे, अशी मागणी आहे.

टॅग्स :sandवाळू