प्रवेशद्वारावरच सॅनिटायझर कक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 05:01 IST2020-04-21T05:00:00+5:302020-04-21T05:01:11+5:30
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग अतिशय महत्त्वाची आहे. पंचायत समितीमध्ये येणाºया अधिकारी, कर्मचारी व लाभार्थी किंवा अन्य नागरिकांना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी निर्जंतुकीकरणावर भर देण्यात आला. परंतु शरीरावर अल्कोहोल, क्लोरिन, लॉयझॉलचा फवारा मारल्याने आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो, असे मत आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

प्रवेशद्वारावरच सॅनिटायझर कक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कोरची पंचायत समितीच्या मुख्य प्रवेशद्वारावर सॅनिटायझर डोम कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात पहिल्यांदाच कोरची पं.स.मध्ये बीडीओ देवीदास देवरे यांच्या पुढाकाराने सदर कक्ष उभारण्यात आला आहे.
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग अतिशय महत्त्वाची आहे. पंचायत समितीमध्ये येणाºया अधिकारी, कर्मचारी व लाभार्थी किंवा अन्य नागरिकांना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी निर्जंतुकीकरणावर भर देण्यात आला. परंतु शरीरावर अल्कोहोल, क्लोरिन, लॉयझॉलचा फवारा मारल्याने आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो, असे मत आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. मात्र निर्जंतुकीकरणासाठी साबणयुक्त पाणी वापरले जात असल्याने सदर पाणी निर्जंतुकीकरणासाठी योग्य आहे. यामुळे शरीराला कोणताच अपाय होत नाही, असेही देवरे यांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे सॅनिटायझर डोममध्ये प्रवेश केल्यानंतर सर्वात आधी बटन दाबावी लागते. त्यानंतर फवारणीला सुरूवात होते. या डोममध्ये चारही बाजूंनी जवळपास एक मिनीट द्रावणाचा फवारा गोल फिरून मारला जात आहे. त्यानंतर बटन बंद करून समोर जावे लागते. पं.स.मध्ये येणाºया प्रत्येक व्यक्तीचे निर्जंतुकीकरण होण्यास मदत झाली आहे. याशिवाय तालुक्यातील ग्रामपंचायत अंतर्गत येणाºया गावांमध्ये सार्वजनिक ठिकाणी सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी केली जात आहे. नागरिकांनी वारंवार स्वच्छ हात धुवून काळजी घ्यावी, असे आवाहन बीडीओ देवरे यांनी केले आहे. याप्रसंगी विस्तार अधिकारी राजेश फाये, नितीन नैताम हजर होते.