शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

‘त्या’ मृत बिबट्याचे नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 6:00 AM

१७ नोव्हेंबर रोजी कुरूंझानजीकच्या जंगल परिसरात एका गुराख्याला बिबट मृतावस्थेत पडला असल्याचे दिसून आले. ही माहिती वन विभागाला मिळाल्यानंतर शोधमोहीम राबविण्यात आली. मात्र बिबट्या आढळला नाही. त्यानंतर १८ नोव्हेंबरला गुराख्यासमवेत मोहीम राबविल्यानंतर कक्ष क्रमांक ३ मध्ये बिबट्या मृतावस्थेत आढळला.

ठळक मुद्देचंद्रपुरातून येणार अहवाल : वन विभागाची अधिकृत माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : तालुक्यातील पोर्ला वन परिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या कुरूंझानजीकच्या पाल नदीच्या परिसरात चुरचुरा कक्ष क्रमांक ३ मध्ये मृतावस्थेत आढळलेल्या बिबट्याच्या अवयवाचे नमुने चंद्रपूर येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच त्या बिबट्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे कळणार आहे, अशी माहिती वन विभागाच्या अधिकृत सूत्रांकडून मिळाली.१७ नोव्हेंबर रोजी कुरूंझानजीकच्या जंगल परिसरात एका गुराख्याला बिबट मृतावस्थेत पडला असल्याचे दिसून आले. ही माहिती वन विभागाला मिळाल्यानंतर शोधमोहीम राबविण्यात आली. मात्र बिबट्या आढळला नाही. त्यानंतर १८ नोव्हेंबरला गुराख्यासमवेत मोहीम राबविल्यानंतर कक्ष क्रमांक ३ मध्ये बिबट्या मृतावस्थेत आढळला. वडसा वन विभागाचे एसीएफ बी.व्ही. कांबळे, पोर्लाचे वन परिक्षेत्राधिकारी एम.चांगले, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.रामटेके व वनकर्मचाऱ्यांनी पंचनामा करून शवविच्छेदन केले. मृत बिबट्याचे पाच ते सहा नमुने व्हिसेरा तपासणीसाठी चंद्रपूर येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून तेथून अहवाल प्राप्त झाल्यानंतरच बिबट्याच्या मृत्यूचे नेमके कारण कळणार आहे, असे वडसा वन विभागाचे एसीएफ बी. व्ही. कांबळे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. पशुवैद्यकीय अधिकाºयाच्या अंदाजानुसार रानडुकराचे मांस खाल्याने संसर्ग होऊन सदर बिबट्याचा मृत्यू झाला असावा. मात्र हा प्राथमिक अंदाज आहे, असे त्यांनी सांगितले.एका वाघिणीसह दोन बछड्यांचा वावरपोर्ला वन परिक्षेत्रात एक वाघीण व तिचे दोन बछडे संचार करीत असल्याचे दिसून आल्याने या भागातील लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोर्ला-देलोडा मार्गावर पोर्लापासून चार किमी अंतरावर बुधवारी काही नागरिकांना वाघीण व तिच्या बछड्याचे दर्शन झाल्याची माहिती मिळाली आहे. वन विभागानेही या भागात वाघीण असल्याच्या वृत्तास दुजोरा दिला आहे. गावात दवंडी देऊन व दर्शनी भागात फलक लावून नागरिकांनी सावध राहावे, असा इशारा वन विभागातर्फे देण्यात आला आहे.सावंगी परिसरात बिबट्याची दहशतदेसाईगंज : देसाईगंजपासून तीन किमी अंतरावर असलेल्या सावंगी परिसरातील टेकडी परिसरात नर व मादी बिबट आढळून येत आहे. मागील १५ दिवसांपासून बिबट्यांनी बस्तान मांडले असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहेत. बिबट्यांच्या या जोडीने गांधीनगर येथील जवळपास १० शेळ्यांचा फडशा पाडला आहे. गावात बिबट येत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री बाहेर निघण्यास नागरिक तयार होत नाही.कोंढाळा, कासवी परिसरातही पट्टेदार वाघ अनेकांना आढळून येत आहे. याच वाघाने कोंढाळा परिसरातील अनेक जनावरांचा फडशा पाडला आहे. कोंढाळा हे गाव देसाईगंज-आरमोरी मार्गावर येते. या परिसरातून प्रवास करताना प्रवाशांच्या जीवाला धोका आहे. प्रवास करताना विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन वन विभागाने केले आहे.

टॅग्स :Tigerवाघ