एकाच दिवशी ६५ जणांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 05:00 IST2020-09-08T05:00:00+5:302020-09-08T05:00:29+5:30
योग्य उपचारानंतर सोमवारी ६५ जण पॉझिटिव्हवरून निगेटिव्ह झाले. त्यामध्ये गडचिरोली येथील ८, अहेरी २, सिरोंचा ४, कुरखेडा १ आणि धानोरा येथील १ एवढ्या जणांचा समावेश आहे. तर १९ नवीन कोरोना बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील १३ जण आहेत.

एकाच दिवशी ६५ जणांची कोरोनावर मात
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यात रविवारी क्रियाशिल असणाऱ्या २९२ कोरोनारुग्णांपैकी सोमवारी एकाच दिवशी ६५ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना सुटी देण्यात आली. त्यामुळे २२७ रुग्ण शिल्लक होते. पण सायंकाळपर्यंत पुन्हा त्यात १९ पॉझिटिव्हची भर पडल्यामुळे क्रियाशिल रुग्णांची संख्या आता २४६ झाली आहे. सोमवारी कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक ४९ जण चामोर्शी तालुक्यातील आहेत.
योग्य उपचारानंतर सोमवारी ६५ जण पॉझिटिव्हवरून निगेटिव्ह झाले. त्यामध्ये गडचिरोली येथील ८, अहेरी २, सिरोंचा ४, कुरखेडा १ आणि धानोरा येथील १ एवढ्या जणांचा समावेश आहे. तर १९ नवीन कोरोना बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील १३ जण आहेत. त्यामध्ये तीन जिल्हा सामान्य रु ग्णालयातील कर्मचारी, २ बसेरा कॉलनीतील नागरिक, एक सर्वोदय वॉर्डमधील रहिवासी, साईनगर कॉलनीतील एक, पोलीस कॉलनीत एक, तसेच एक जण कोटगल कॉलोनीमधील, एक गोकुळनगर, एक कॅम्प एरियातील आणि २ जण कलेक्टर कॉलनीमधील आहेत. याशिवाय कुरखेडा व चामोर्शीतील प्रत्येक एक जण, वडसा येथील एक प्रवासी आणि ३ कोरोनाबाधितांच्या संपर्कातील मिळून ४ जणांचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १०५४ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
कोरोनाची लागण पसरू नये, परिसरातील नागरिकांना संसर्ग होवू नये याकरिता माजी जि.प.सदस्य सुरेंद्रसिंह चंदेल यांनी पुढाकार घेत शहरातील राजकीय पदाधिकारी, व्यापारी बांधव, सामाजिक कार्यकर्ते व लहान मोठे धंदेवाईक यांच्या समन्वयातून चर्चा करत शनिवार व रविवार या दोन दिवसांचा जनता कर्फ्यू करण्याचे ठरवले होते. त्याला शहरातील व्यावसायिक बांधवांनी स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद देत दुकाने बंद ठेवली. परंतु स्थानिक नगर पंचायत प्रशासनाला संपुर्ण बाजारपेठ निर्जंतुकीकरण करण्यासाठी निवेदन दिल्यानंतरही न.प.च्या अधिकाऱ्यांनी परिस्थितीची दखल न घेतल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली. जनता कर्फ्यूसाठी प्रथम नगराध्यक्ष डॉ.महेंद्रकुमार मोहबंसी, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष विलास गावंडे, काँग्रेस कमिटीचे पी.आर.आकरे, राष्ट्रवादीचे अयुबभाई, प्रभारी नगराध्यक्ष रविंद्र गोटेफोडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जयंत हरडे ,जेष्ठ व्यवसायिक गणपतराव सोनकुसरे, मुजफ्फर बारी, व्यापारी असोसिएशनचे रामभाऊ वैद्य, नानक मनुजा, नगरसेवक पुंडलिक देशमुख, सभापती सोनू भट्टड आदी अनेकांनी सहकार्य केले.
कुरखेडात जनता कर्फ्यू यशस्वी
कुरखेडा : कोविड-१९ अनलॉकच्या पाचव्या टप्प्यात रविवारीही दुकाने सुरू ठेवण्यास प्रशासनाने मुभा दिली. परंतु मागील आठवड्यात कुरखेडा शहरातील एका व्यवसायिकासह १७ जण जण कोरोनाबाधित आढळल्याने शहरात खळबळ उडाली होती. त्यामुळे व्यावसायिकांनी सर्व दुकाने बंद ठेवत शनिवार व रविवारी जनता कर्फ्यू पाळला.