शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

६३ एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढ मान्य; ६३७ जणांना अमान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2021 05:00 IST

एसटीचा संप सुरू झाल्यावर काही दिवस प्रवाशांना अडचण झाली. मात्र, प्रत्येक समस्येवर उपाय असतो. त्याचप्रमाणे नागरिकांनी आता उपाय शाेधला आहे. खासगी प्रवासी वाहनांची संख्यासुद्धा वाढली आहे. त्यामुळे आता नागरिक प्रवासासाठी एसटीऐवजी खासगी वाहनांची प्रतीक्षा करीत आहेत. एसटीचा संप सुरू असल्याने खासगी वाहनधारक सुरुवातीला जास्तीचे तिकीट आकारत हाेते. आता मात्र तेही एसटीएवढेच तिकीट आकारतात.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर ताेडगा काढण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात  तीन हजार ते पाच हजार रुपयांपर्यंतची वाढ केली आहे.  वेतनवाढीनंतर एसटी कर्मचारी संप मागे घेऊन कामावर रुजू हाेतील, अशी अपेक्षा हाेती. मात्र, संपकरी कर्मचारी कामावर रुजू झाले नसले तरी  काही कर्मचारी व प्रशासकीय अधिकारी अजूनही काम करीत आहेत. शासनाने दिलेल्या वेतनवाढीवर ते समाधानी आहेत. गडचिराेली आगारातील एकूण ४४५ कर्मचाऱ्यांपैकी ४५ कर्मचारी नियमित काम करीत आहेत. तर, ४०० कर्मचारी संपावर आहेत. अहेरी आगारातील २५५ कर्मचाऱ्यांपैकी १८ कर्मचारी संपात नाहीत. २३७ कर्मचारी संपावर आहेत.

खासगी वाहनांची सवय लागली; बसस्थानकाकडे प्रवासी फिरकेना

एसटीचा संप सुरू झाल्यावर काही दिवस प्रवाशांना अडचण झाली. मात्र, प्रत्येक समस्येवर उपाय असतो. त्याचप्रमाणे नागरिकांनी आता उपाय शाेधला आहे. खासगी प्रवासी वाहनांची संख्यासुद्धा वाढली आहे. त्यामुळे आता नागरिक प्रवासासाठी एसटीऐवजी खासगी वाहनांची प्रतीक्षा करीत आहेत. एसटीचा संप सुरू असल्याने खासगी वाहनधारक सुरुवातीला जास्तीचे तिकीट आकारत हाेते. आता मात्र तेही एसटीएवढेच तिकीट आकारतात. काही जण तर त्यापेक्षा कमी तिकीट आकारतात. एसटी कर्मचाऱ्यांना किती दिवस संप करायचा आहे, ते त्यांनी करावा. संपाचा फारसा फरक पडणार नाही.- प्रशांत देशमुख, प्रवासी

विलीनीकरणाची बाब न्यायालयात गेली आहे. न्यायालयाचा निर्णय लागण्यास कित्येक वर्षे लागू शकतात. ताेपर्यंत एसटी कर्मचारी संप करणार असतील, तर एसटी आपाेआप बुडून जाईल व एसटी कर्मचाऱ्यांच्या हातचा राेजगारही हिरावला जाईल. राेजगार जाईल तेव्हा एसटी कर्मचाऱ्यांना राेजगाराची किंमत काय हाेती, ते कळेल. मात्र, एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर अडून बसले आहेत. शासनाने काही प्रमाणात चालक व वाहकांची भरती करण्यास काहीच हरकत नाही. राज्यातील बेराेजगारांना यातून राेजगार मिळेल व नागरिकांची समस्यासुद्धा सुटण्यास मदत हाेईल.- विकास लाडे, प्रवासी

 

टॅग्स :state transportएसटीStrikeसंप