आश्रमशाळांतील कामगारांचे वेतन प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:34 IST2021-02-12T04:34:25+5:302021-02-12T04:34:25+5:30
गडचिराेली : शासकीय आश्रमशाळांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या ठेका कामगारांचे वेतन मार्च २०२०पासून मिळाले नाही. त्यामुळे कामगारांसमाेर आर्थिक ...

आश्रमशाळांतील कामगारांचे वेतन प्रलंबित
गडचिराेली : शासकीय आश्रमशाळांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या ठेका कामगारांचे वेतन मार्च २०२०पासून मिळाले नाही. त्यामुळे कामगारांसमाेर आर्थिक संकट आहे. कामगारांना लवकर वेतन द्यावे, अशी मागणी कामगारांनी केली आहे. शासकीय आश्रमशाळांमध्ये तासिकातत्त्वावर काम करणारे राेजंदारी शिक्षक तसेच ठेका पद्धतीने काम करणारे सुरक्षारक्षक, स्वयंपाकी, कामाठी, शिपाई, चाैकीदार आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करताना काेराेनाचे संकट आड आले नाही. परंतु ४० हजारांचे काम ८ हजारात करणाऱ्या कामगारांना कामावरून मार्च २०२०पासून बंद केले. एवढेच नव्हे तर तीन महिने केलेल्या कामाचे वेतन देण्यात आले नाही, असा आराेप चतुर्थ श्रेणी आश्रमशाळा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रा. रमेशचंद्र दहीवले यांनी केला आहे. सेमाना येथे पार पडलेल्या बैठकीला प्रमाेद गाेडघाटे, ज्ञानेश्वर सयाम, मधुकर काेहळे, महेंद्र गाेरडवार, नागेश कुळसंगे, दिनेश काेडापे, केये कुड्यामी, सुशीला पुंगाटी, अंतकला मडावी, नंदा काेडाप, किरण मेश्राम, रंजना कुमरे, कुंदन कुमरे उपस्थित हाेते.