सख्ख्या भावानेच केली भावाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:33 IST2021-04-05T04:33:22+5:302021-04-05T04:33:22+5:30

मृत पावलेल्या इसमाचे नाव गणेश ताताजी नैताम असे आहे. आरमोरी पोलीस स्टेशन हद्दीतील शेगावटोली मध्ये गणेश ताताजी ...

Sakhya's brother killed his brother | सख्ख्या भावानेच केली भावाची हत्या

सख्ख्या भावानेच केली भावाची हत्या

मृत पावलेल्या इसमाचे नाव गणेश ताताजी नैताम असे आहे.

आरमोरी पोलीस स्टेशन हद्दीतील शेगावटोली मध्ये गणेश ताताजी नेताम (२८ वर्ष) व त्याचा लहान भाऊ विकेश ताताजी नेताम (२६) हे सोबत राहत होते. दिनांक ३ मार्चला रात्री १० वाजता गणेश आणि विकेश यांच्यात भांडण झाले. सदर भांडणाचा राग डोक्यात ठेवून विकेश याने पहाटे ५ वाजण्याच्या दरम्यान गणेश झोपला असताना, त्याच्या डोक्यावर, छातीवर कुऱ्हाडीचे वार करून हत्या केली. यात त्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणी आरमोरी पोलीस स्टेशन येथे आरोपी विकेश नैताम याचे विरुद्ध भा.दं.वि. कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून, आरोपीस अटक करण्यात आले आहे, अधिक तपास सपोनि पंकज बोण्डसे हे करीत आहेत.

Web Title: Sakhya's brother killed his brother