साेमनपल्ली पुलामुळे १८ गावांचा संपर्क जुळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:38 IST2021-05-07T04:38:44+5:302021-05-07T04:38:44+5:30

सिराेंचा : महाराष्ट्र, तेलंगणा व छत्तीसगड या तीन राज्यांना जाेडणाऱ्या निजामाबाद-जगदलपूरचे काम पूर्ण झाले आहे. तसेच इंद्रावती व प्राणहिता ...

Saemanpalli bridge will connect 18 villages | साेमनपल्ली पुलामुळे १८ गावांचा संपर्क जुळणार

साेमनपल्ली पुलामुळे १८ गावांचा संपर्क जुळणार

सिराेंचा : महाराष्ट्र, तेलंगणा व छत्तीसगड या तीन राज्यांना जाेडणाऱ्या निजामाबाद-जगदलपूरचे काम पूर्ण झाले आहे. तसेच इंद्रावती व प्राणहिता नदीवर दाेन माेठ्या पुलाचे बांधकाम झाले; परंतु साेमनपल्ली गावाजवळील पुलाचे बांधकाम न झाल्याने दरवर्षी पावसाळ्यात १८ गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटत हाेता; परंतु आता येथील पुलाचे काम प्रगतिपथावर असल्याने पावसाळ्यातील अवराेध संपुष्टात येणार आहे.

साेमनपल्ली गावाजवळील पुलाचे बांधकाम न झाल्याने दरवर्षी पावसाळ्यात नाल्याला इंद्रावती नदीचे पुराचे पाणी येत हाेते. त्यामुळे नाल्यात पुराचे पाणी भरून असायचे. परिसरातील १८ गावांचा संपर्क तुटायचा. त्यामुळे येथे उंच पुलाचे बांधकाम करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत हाेती. मागील वर्षी नागरिकांच्या मागणीची दखल घेत राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाद्वारे पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले. जवळपास १६ काेटी रुपयांचा खर्च पूल बांधकामावर केला जात आहे. काही महिन्यांतच हे बांधकाम पूर्ण हाेणार आहे. या पावसाळ्यात बांधकाम पूर्णत्वास येण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे पुलाअभावी दरवर्षी पावसाळ्यात परिसरातील नागरिक नावेद्वारे नाला पार करीत हाेते. मागील वर्षी तेलंगणातील एका व्यापाऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला हाेता. त्यानंतरही नागरिकांनी येथे पुलाचे बांधकाम लवकर पूर्ण करावे, अशी मागणी केली हाेती.

बाॅक्स...

छत्तीसगड राज्याशीही तुटत हाेता संपर्क

सिराेंचा तालुक्यातील १८ गावांसह छत्तीसगड राज्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील रहदारी सदर नाल्याला आलेल्या पुरामुळे बंद व्हायची. त्यामुळे नागरिकांनी अनेकदा साेमनपल्ली नाल्यावर पुलाचे बांधकाम करण्याची मागणी केली. येथील पुलाचे बांधकाम पूर्णत्वास येत असल्याने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६३ निजामाबाद ते जगदलपूर राष्ट्रीय महामार्गाला अवराेध ठरणारा प्रश्न निकाली निघणार आहे.

===Photopath===

060521\06gad_6_06052021_30.jpg

===Caption===

साेमनपल्ली नाल्यावर प्रगतीपथावर असलेले पुलाचे बांधकाम.

Web Title: Saemanpalli bridge will connect 18 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.