शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
2
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
3
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
4
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
5
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
6
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
7
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
9
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
10
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
11
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
12
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
13
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
14
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
19
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
20
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण विद्यार्थ्यांना पडला अभ्यासक्रमाचा विसर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2020 05:00 IST

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले हाेते. परंतु कोरोना काही प्रमाणात नियंत्रणात आल्यानंतर लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्यात आली. दरम्यान हळूहळू परिस्थितीत बदल घडून येत असले तरी जिल्ह्यातील शाळा प्रत्यक्ष सुरू झाल्या नाहीत. ऑनलाईन शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र ग्रामीण व दुर्गम भागात इंटरनेट सुविधा प्रभावी नसल्याने ग्रामीण विद्यार्थी या शिक्षणापासून वंचित राहत आहे.

ठळक मुद्देदुर्गम भागातील जि.प.शाळांचे वास्तव

  लाेकमत न्यूज नेटवर्कजारावंडी : कोरोना विषाणूच्या भीतीने राज्यात आजपर्यंत शाळा बंद आहेत. शाळा बंदचा जास्तीत जास्त परिणाम ग्रामीण व दुर्गम भागात झाल्याचे चित्र पाहायला मिळते. इयत्ता पहिली ते चवथीपर्यंत शिक्षण घेणारे जि.प.शाळेतील विद्यार्थी चक्क अभ्यासक्रमच विसरलेे असल्याचे दिसून येत आहे. गडचिराेली जिल्ह्याच्या दुर्गम व ग्रामीण भागात इंटरनेटअभावी ऑनलाईन शिक्षण कुचकामी ठरत असून ग्रामीण विद्यार्थी गुणवत्तेत मागे पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले हाेते. परंतु कोरोना काही प्रमाणात नियंत्रणात आल्यानंतर लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्यात आली. दरम्यान हळूहळू परिस्थितीत बदल घडून येत असले तरी जिल्ह्यातील शाळा प्रत्यक्ष सुरू झाल्या नाहीत. ऑनलाईन शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र ग्रामीण व दुर्गम भागात इंटरनेट सुविधा प्रभावी नसल्याने ग्रामीण विद्यार्थी या शिक्षणापासून वंचित राहत आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील ८० टक्के पालकांकडे स्मार्ट फाेन नाही. जारावंडीसारख्या ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थी शाळा बंद असल्याने  शालेय अभ्यासक्रम  विसरले आहेत. १ ते १०० पर्यंतचे पाढे म्हणता येत नाही. मराठी भाषेतील वाचन व लेखन अचूकरित्या येत नाही. परिसर आदिवासीबहुल असल्याने शिक्षणाचा प्रसार कमी आहे. काही वर्षांपूर्वी आदिवासी समाजाची मुले शाळेत जायला घाबरत होती. परंतु शासनाने विद्यार्थ्यांसाठी अनेक उपाययोजना करून शिक्षणाच्या प्रवाहात  आणून शिक्षणाची गो़डी निर्माण केली. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पटसंख्या वाढली आहे. परंतु आता शाळा प्रत्यक्ष भरत नसल्याने विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे पाठ फिरवली. पालकांसाेबत शेतात जाऊ लागली आहे. 

बरेच पालक जागरूक नाहीतदुर्गम भागातील बऱ्याच कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून त्यांच्याकडे स्मार्ट फाेनचा अभाव आहे. विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या साेयीसुविधा, तज्ज्ञ शिक्षक व तंत्रज्ञानाचा वापर याबाबत बरेच पालक अनभिज्ञ आहेत. कारण ग्रामीण भागात अशिक्षित पालकांची संख्या माेठी आहे. परिणामी शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील विद्यार्थी यंदा गुणवत्तेत मागे पडणार आहेत. अभ्यासाऐवजी ते विविध खेळात मग्न असल्याचे दिसून येते.

 

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाStudentविद्यार्थी