सीईओंच्या भूमिकेमुळे प्रशासकीय कामात येत आहे गतिमानता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2021 05:00 AM2021-10-24T05:00:00+5:302021-10-24T05:00:42+5:30

गुरुवारला जिल्हा परिषदेच्या वीर बाबूराव शेडमाके सभागृहात जिल्हा परिषद मुख्यालयातील सर्व लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांची सभा व कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बाेलत हाेते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी कर्मचारी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा जि. प. कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले हाेते. यावेळी मंचावर जि. प. कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रतन शेंडे, ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष कविश्वर बनपूरकर आदी उपस्थित हाेते. 

The role of CEOs is accelerating administrative work | सीईओंच्या भूमिकेमुळे प्रशासकीय कामात येत आहे गतिमानता

सीईओंच्या भूमिकेमुळे प्रशासकीय कामात येत आहे गतिमानता

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : जिल्हा परिषदेअंतर्गत बरेच लिपिकवर्गीय कर्मचारी मागील काही कालावधीत सरळसेवेने, अनुकंपा तत्त्वावर तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून नव्याने नियुक्त झाले. दोन वर्ष हे कोराना संसर्गात गेल्याने कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देता आले नाही. परंतु जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, कुमार आशीर्वाद यांनी कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबी तातडीने निकाली काढण्यास व प्रलंबित मागण्यांसाठी घेतलेला पुढाकार यामुळे प्रशासकीय कामात गतिमानता येत आहे, असे गौरवोद्गार जि. प. कर्मचारी महासंघ आणि लिपिकवर्गीय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी काढले.
गुरुवारला जिल्हा परिषदेच्या वीर बाबूराव शेडमाके सभागृहात जिल्हा परिषद मुख्यालयातील सर्व लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांची सभा व कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बाेलत हाेते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी कर्मचारी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा जि. प. कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले हाेते. यावेळी मंचावर जि. प. कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रतन शेंडे, ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष कविश्वर बनपूरकर आदी उपस्थित हाेते. 
उमेशचंद्र चिलबुले यांनी शासनाकडून सुरू असलेले कर्मचारी विरोधी धोरण, नवनवीन कामगार कायदे यामुळे कर्मचाऱ्यांवर फौजदारी प्रकरण उद्भवण्याची शक्यता आहे, असे सांगितले. रतन शेंडे यांनी २९ ऑक्टोबर रोजीच्या राज्यव्यापी ठिय्या आंदोलनात सहभागी व्हावे, तसेच संघटनेच्या कामात हिरिरीने सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले. संघटनेचे काम करताना प्रत्येक कर्मचाऱ्यांमध्ये वकृत्वशैली, बुद्धिमत्ता व संघटनक्षमता असणे आवश्यक आहे. संघटनेच्या प्रत्येक वाटचालीत सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषद लिपिकवर्गीय संघटनेचे सरचिटणीस फिरोज लांजेवार यांनी केले.
प्रास्ताविक धनंजय दुमेट्टीवार, संचालन सारंग गायकवाड यांनी केले तर आभार माया बाळराजे यांनी मानले. यशस्वीतेसाठी संघटनेचे सदस्य व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. 

लिपिकवर्गीय संघटनेची मुख्यालय शाखा गठित
यावेळी लिपिकवर्गीय संघटनेची मुख्यालय शाखा गठित करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष म्हणून धनंजय दुम्पेट्टीवार यांची फेरनिवड करण्यात आली. सचिव म्हणून गिरीश बुद्धावार, कार्याध्यक्ष योगेश वैद्य, उपाध्यक्ष सुनीता घाईत (रामटेके), कोषाध्यक्ष सचिन मांडवगडे यांची निवड करण्यात आली. तसेच विभागप्रमुख म्हणून डंबाजी मेश्राम, राजू हेमके, सुरेश कांबळे, परशुराम गानफाडे, मथूर क्रिष्णापूरकर, रितू नरोटे, कुनघाडकर, योगिता दोनाडकर, सुनीता धाईत, दिलीप सोनटक्के, सुनीता दहीकर, नयना कुमरे, प्रसिद्धीप्रमुख आशिष मोटर व रूपेश आत्राम यांची निवड केली.

यांचा झाला सत्कार 
प्रशासकीय मार्गदर्शन संपल्यानंतर सभेमध्ये जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दुधराम रोहणकर, सरचिटणीस फिरोज लांजेवार, कार्याध्यक्ष उमेशकुमार लोहकरे, कोषाध्यक्ष अखिल श्रीरामवार, सहकोषाध्यक्ष गणेश सुंकरवार, उपाध्यक्ष रितेश वनमाळी, महिला उपाध्यक्ष गिता कुतीरकर, सहसचिव स्वप्निल पुलके, मानद सचिव अविनाश सिडाम, मुस्ताक शेख सल्लागार एस. यू. सांडे, कमलेश मेश्राम, महिला प्रतिनिधी सुनीता आत्राम, सुनीता घाईत, माया बाळराजे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

 

Web Title: The role of CEOs is accelerating administrative work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app