रोहयो मजूरांची दिवाळी अंधारात

By Admin | Updated: October 22, 2014 23:17 IST2014-10-22T23:17:33+5:302014-10-22T23:17:33+5:30

तालुक्यातील मुरूमगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत मातीकाम करण्यात आले. मात्र या कामावरील मजुरांना अद्यापही मजुरी न मिळाल्यामुळे म््राुरूमगावच्या रोहयो

Rohuya laborers in Diwali dark | रोहयो मजूरांची दिवाळी अंधारात

रोहयो मजूरांची दिवाळी अंधारात

धानोरा : तालुक्यातील मुरूमगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत मातीकाम करण्यात आले. मात्र या कामावरील मजुरांना अद्यापही मजुरी न मिळाल्यामुळे म््राुरूमगावच्या रोहयो मजूरांची दिवाळी अंधारातच जाणार असल्याचे दिसून येते. मजुरी मजूरी मिळावी याकरीता मुरूमगावच्या मजुरांनी भाजपाचे धानोरा तालुकाध्यक्ष लता पुंघाटी यांच्या नेतृत्वात रोजगार सेवकासह चक्क पोलीस ठाणे गाठले. व पोलिसांना आपली आपबिती सांगितली.
रोजगार हमी योजनेचे काम करून अनेक महिन्यांचा कालावधी लोटला. मात्र मजुरांना मजुरी मिळाली नाही. त्यामुळे मुरूमगावातील रोहयो मजूर गेल्या अनेक दिवसांपासून आर्थिक अडचणीत सापडले आहेत. दिवाळीच्या सणासाठी मजुरीचे पैसे मिळावे, याकरीता मातीकाम केलेल्या सर्व रोहयो मजुरांनी मजुरीसाठी रोजगार सेवकाकडे तगादा लावला. मात्र संबंधित रोजगार सेवकाने केवळ वेळ निभावून नेण्याच्या पलिकडे काहीही केले नाही.
त्यानंतर लताबाई पुंगाटी यांच्यासोबत रोहयो मजूर वैनगंगा कृष्णा ग्रामीण बँकेत जाऊन रोहेया कामाची मजुरी मजूरांच्या खात्यात जमा झाली किंवा नाही याची चौकशी केली. यावेळी मजुरीचे पैसे मजुरांच्या खात्यात जमा झाले नसल्याचे मजूरांना सांगितले. त्यानंतर मुरूमगावचे सरपंच अजमन रावटे यांनी मजूरांना घेऊन रोजगार सेवकासह ग्रामपंचायत कार्यालय गाठले. त्या ठिकाणी रोहयोच्या कामाबाबत मजुरांचे हजेरी पत्रक व कागदपत्रे तसेच मजुरीची चौकशी केली असता, मजुरांच्या खात्यात मजुरी जमा झाली नसल्याचे निर्दशनास आले. धानोरा पंचायत समिती प्रशासनाकडे मजुरीसंदर्भात विचारणा केली असता ५ लाख ३९ हजार २३१ रूपयांची रक्कम राष्ट्रीयकृत व ग्रामीण बँकांकडे पाठविली असल्याचे सांगण्यात आले. मात्र एकाही मजुरांच्या खात्यात रोहयो कामाचे पैसे जमा झाले नसल्याचे दिसून आले. त्यामुळे पंचायत समितीने पाठविलेली रक्कम कुठे गेली असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मजुरांची पिळवणुक होण्यासाठी ग्रा. प. सचिव, सरपंच व रोजगार सेवक आदी जबाबदार असल्याचा आरोप मजूरांनी केला आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Rohuya laborers in Diwali dark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.