कट मारून जाणाऱ्या ट्रकचालकाला लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 05:01 IST2020-08-30T05:00:00+5:302020-08-30T05:01:27+5:30

एका पांढऱ्या रंगाच्या कारमधील लुटारू ट्रकचा पाठलाग करीत होते. मात्र ही बाब ट्रक चालकाच्या लक्षात आली नाही. ट्रकमध्ये ड्रायव्हर एकटाच असल्याचे बघून लुटारूंनी ट्रकला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने ट्रक थांबविला नाही. काही दूर पुन्हा ट्रकचा पाठलाग केल्यानंतरही ट्रक थांबत नसल्याने लुटारूंनी धावत्या कारमधून ट्रक चालकाच्या हाताला लोखंडी रॉड फेकून मारला. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून ट्रक रस्त्याच्या बाजुला जाऊन उलटला.

Robbed the truck driver of the cut | कट मारून जाणाऱ्या ट्रकचालकाला लुटले

कट मारून जाणाऱ्या ट्रकचालकाला लुटले

ठळक मुद्देरॉड फेकून मारला । नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटला

लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची : कट मारून गेल्याच्या रागातून एका ट्रक चालकाला लुटण्याचा आणखी एक प्रकार तालुक्यात उघडकीस आला. यात धावत्या ट्रकचा पाठलाग करूनही ट्रक चालकाने वाहन न थांबविल्याने लुटारूंनी चालकाला लोखंडी रॉड फेकून मारला. यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून ट्रक रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला. ही घटना कुरखेडा मार्गावर कोरचीपासून एक किमी अंतरावर शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. चालक मुनेश सिंग किरकोळ जखमी झाला आहे.
छत्तीसगड राज्यातील रायपूरवरून लोंखडी पाईप घेऊन सीजी-०४, जेबी ८६२६ क्रमांकाचा ट्रक शनिवारी पहाटेच्या सुमारास छत्तीसगड राज्याची सीमा सोडत बोटेकसामार्गे महाराष्ट्राच्या सीमेत आला. त्यानंतर एका पांढऱ्या रंगाच्या कारमधील लुटारू ट्रकचा पाठलाग करीत होते. मात्र ही बाब ट्रक चालकाच्या लक्षात आली नाही. ट्रकमध्ये ड्रायव्हर एकटाच असल्याचे बघून लुटारूंनी ट्रकला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने ट्रक थांबविला नाही. काही दूर पुन्हा ट्रकचा पाठलाग केल्यानंतरही ट्रक थांबत नसल्याने लुटारूंनी धावत्या कारमधून ट्रक चालकाच्या हाताला लोखंडी रॉड फेकून मारला. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून ट्रक रस्त्याच्या बाजुला जाऊन उलटला.
या अपघातात ट्रक चालक मुनेश सिंग याला किरकोळ दुखापत झाली मात्र जीव वाचला. यानंतर या टोळीने ट्रकच्या समोरचे काच फोडून चालकाला बाहेर काढून बेदम मारहाण केली. मारत-मारत कोरची गावाजवळ असलेल्या चहा-टपरीवर नेऊन बसविले. त्याच्या पोटाला चाकू लावून रोख रक्कम कुठे आहे सांग, अन्यथा जीवे मारू, अशी धमकी दिली. माझ्याकडे आहे तेवढे घेऊन जा मात्र मला मारू नका, अशी विनवणी ट्रकचालकाने केली. दोघांनी चालकाला पकडून ठेवले तर तिघांनी ट्रकची झडती घेतली. ट्रकची बॅटरी, दोन लोखंडी जॅक, ट्रकच्या केबिनमधला स्वयंपाक व रोजच्या वापराचे सामान, ताडपत्री, मोबाईल, ड्रायव्हिंग लायसन्स, चिल्लर पैसे व जोडे सुद्धा त्या लुटारूंनी नेले. यानंतर ते पळून गेले. सकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांना वाहन चालकाने आपबिती सांगितली.

विशेष म्हणजे एक महिन्यापूर्वी कुरखेडा-कोरची मार्गावरील बेळगाव घाटावर दुचाकीस्वाराला लुटल्याची घटना घडली होती. त्यामुळे या भागात नक्षलवाद्यांच्या नावावर लुटणारी टोळी सक्रीय असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी या टोळीला जेरबंद करणे आवश्यक आहे. या मार्गाने रायपूरवरून हैदराबादसाठी अनेक ट्रक धावतात. या ट्रक चालकांच्या जीवाला धोका होण्याची शक्तता नाकारता येत नाही.

Web Title: Robbed the truck driver of the cut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Robberyचोरी