आष्टी येथे रस्ता सुरक्षा जनजागृती
By Admin | Updated: January 23, 2015 02:22 IST2015-01-23T02:22:40+5:302015-01-23T02:22:40+5:30
मुलचेरा पोलीस स्टेशनच्यावतीने रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत आष्टी येथे रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात आले. यावेळी गावात जनजागृती रॅली काढण्यात आली.

आष्टी येथे रस्ता सुरक्षा जनजागृती
आष्टी : मुलचेरा पोलीस स्टेशनच्यावतीने रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत आष्टी येथे रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात आले. यावेळी गावात जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीत अनेक शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते.
वाहतूक शाखेच्या वतीने २५ जानेवारीपर्यंत रस्ता सुरक्षा अभियान राबविले जात आहे. त्या अनुषंगाने रॅली काढण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक साळी व सरपंच राकेश बेलसरे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीची सुरुवात करण्यात आली. रॅली आंबेडकर चौकातून काढून ग्रामपंचायतमार्गाने गावातील प्रमुख वार्डांमधून काढण्यात आली. ‘वाहतुकीचे नियम पाळा, अपघात टाळा’ अशा घोषणा देऊन रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करण्यात आली. रॅलीत राजे धर्मराव हायस्कसूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे हरित सेना पथक, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. अपघात टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी वाहतुकीचे नियम पाळून इतरांमध्ये याबाबत जागृती करावी, असे आवाहन करण्यात आले. यावेळी सहाय्यक फौजदार फुलझेले, पोलीस हवालदार रात्रे, पुण्यप्रेड्डीवार, उंदीरवाडे, ऐलावार, कढते, पर्यवेक्षक प्रा. एन. एस. बोरकुटे, हरितसेना प्रमुख डी. जी. पाटील, प्रा. आर. बी. ठवरे, प्रा. आर. आर. इंगोले, प्रा. टिकले, प्रा. नागुलवार, प्रा. किरमिरे तसेच शिक्षक उपस्थित होते. (प्रतिनिधी)