वाढत्या तापमानाचा शेती कामांवर परिणाम
By Admin | Updated: June 4, 2014 23:46 IST2014-06-04T23:46:22+5:302014-06-04T23:46:22+5:30
पावसाचा पहिला नक्षत्र रोहिणी सुरू होऊन आठ ते दहा दिवसाचा कालावधी लोटला आहे. मात्र या पहिल्या नक्षत्रात जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली नाही. या उलट तापमानाचा पारा वाढतच असून तापमानामुळे

वाढत्या तापमानाचा शेती कामांवर परिणाम
गडचिरोली : पावसाचा पहिला नक्षत्र रोहिणी सुरू होऊन आठ ते दहा दिवसाचा कालावधी लोटला आहे. मात्र या पहिल्या नक्षत्रात जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली नाही. या उलट तापमानाचा पारा वाढतच असून तापमानामुळे जिल्ह्यातील शेती कामावर परिणाम झाला असल्याचे दिसून येत आहे.
दरवर्षी साधारणत: जिल्ह्यातील शेतकरी रोहिणी नक्षत्राच्या शेवटच्या चरणात शेतीच्या कामाला सुरूवात करतात. गतवर्षी ३ जूनला झालेल्या पावसाळमुळे जिल्ह्यात शेती कामाला सर्वत्र प्रारंभ झाला होता. मात्र यावर्षीची स्थिती वेगळी आहे. प्रखर उष्णतेनेच दिवस उजाळत आहे. सकाळी ९ वाजतापासून दुपारी ५ वाजेपर्यंत तापमानाचा पारा वाढतच आहे. सध्या जिल्ह्याचा तापमानाचा पारा ४३ अंशापेक्षा वर गेला आहे. यामुळे शेतकरी व शेतमजूर सकाळी १0 वाजतानंतर शेतीची कामे करतांना दिसून येत नाही. यामुळे जिल्ह्यातील बहुतांश शेत मनुष्यविना ओसाड दिसून येत आहे. दरवर्षी मृग नक्षत्राच्या वेळी जिल्ह्यातील शेतामध्ये शेतकरी व शेतमजुरांची गर्दी दिसून येते. शेतीकामासोबतच वन विभागाचे अनेक कामे रखडली आहेत. रोजगार हमी योजनेचीही कामे खोळंबली आहेत.
रोहिणी नक्षत्र कोरेच गेल्यामुळे आता शेतकर्यांचे लक्ष ८ जूनपासून सुरू होणार्या मृग नक्षत्राकडे लागले आहे. मृग नक्षत्रात दरवर्षी अनियमित पाऊस पडत असल्याचा अंदाज हवामान खाते व पंचांगकर्त्यांनी वर्तविला आहे. कृषी तज्ज्ञाच्या सल्ल्याने मृग नक्षत्रात पिकाची लागवड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वाढत्या तापमानामुळे शेतकर्यांनी खरीप हंगामाची तयारी पूर्ण केली नसल्याचे दिसून येते. कृषी विभागाने यंदाच्या खरीप हंगामाचे नियोजन केले आहे. शेतकर्यांमध्ये जागृती सुरू आहे. मात्र तापमानाचा परिणाम झाला आहे. (प्रतिनिधी)