काँग्रेसच्या बैठकीत संघटनात्मक बाबींचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:42 IST2021-08-14T04:42:13+5:302021-08-14T04:42:13+5:30

आढावा बैठकीला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, माजी जिल्हाध्यक्ष हसन गिलानी, जिल्हा उपाध्यक्ष जेसामल मोटवानी, जिल्हा परिषद ...

Review of organizational matters in the Congress meeting | काँग्रेसच्या बैठकीत संघटनात्मक बाबींचा आढावा

काँग्रेसच्या बैठकीत संघटनात्मक बाबींचा आढावा

आढावा बैठकीला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, माजी जिल्हाध्यक्ष हसन गिलानी, जिल्हा उपाध्यक्ष जेसामल मोटवानी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, युवक काँग्रेस पंकज गुड्डेवार, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष परसराम टिकले, माजी जि. प. सदस्य यादोराव ठाकरे, प्रभाकर वासेकर, नगरसेवक हरीष मोटवानी, गणेश फाफट, आरीफ खानानी, जमाल शेख, माजी नगरसेविका निलोफर शेख, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष आरती लहरी, ॲड. संजय गुरू, शहर अध्यक्ष पिंकू बावणे उपस्थित होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस पक्ष वाढीसाठी दिलेल्या सूचना व काँग्रेसचे बुथस्तरीय अभियान शहरामध्ये राबवून काँग्रेस पक्षाला बळकट करावे, असे आवाहन डाॅ. उसेंडी यांनी केले. काँग्रेस पक्षामध्ये मागील काळात निर्माण झालेली गटबाजी विसरून सर्वांनी एकजुटीने काम करावे, असे आवाहन हसन गिलानी यांनी केले. देसाईगंज शहरातील काँग्रेस पक्षाचा इतिहास व मागील काळात काँग्रेस पक्षाची विकासकामे यांचा आढावा घेऊन काँग्रेस पक्ष जनसामान्यांच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध राहील, असे प्रतिपादन जेसामल माेटवानी यांनी केले.

Web Title: Review of organizational matters in the Congress meeting