महसूलमंत्री पाटील आज गडचिरोलीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 23:14 IST2017-11-17T23:14:06+5:302017-11-17T23:14:25+5:30

महसूलमंत्री पाटील आज गडचिरोलीत
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राज्याचे महसूल मदत व पुनर्वसन तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील १८ नोव्हेंबर रोजी शनिवारला गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. चंद्रपूर येथून गडचिरोलीकडे दुपारी ३ वाजता त्यांचे प्रयाण होईल. सायंकाळी ६.४५ वाजता शासकीय विश्रामगृहात ते राखीव राहतील. ५.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या डीपीसी सभागृहात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची ते आढावा बैठक घेणार आहेत. त्यानंतर त्यांचा रात्री गडचिरोलीत मुक्काम आहे. रविवारी सकाळी ७.३० वाजता ते शासकीय वाहनाने गोंदियाकडे प्रयाण करतील.