प्राध्यापक विजय खोंडे यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:38 IST2021-03-17T04:38:14+5:302021-03-17T04:38:14+5:30

प्राध्यापक डॉ. विजय खोंडे यांचे सहकार्य महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी मोलाचे ठरले आहे, असे गाैरवाेद्गार शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अंब्रिशराव आत्राम ...

Retired felicitation of Professor Vijay Khonde | प्राध्यापक विजय खोंडे यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार

प्राध्यापक विजय खोंडे यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार

प्राध्यापक डॉ. विजय खोंडे यांचे सहकार्य महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी मोलाचे ठरले आहे, असे गाैरवाेद्गार शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अंब्रिशराव आत्राम यांनी काढले.

प्राध्यापक विजय खोंडे यांनी शैक्षणिक कामासोबतच अंधश्रद्धा निर्मूलन समिती, मराठी विज्ञान परिषद, निसर्ग मंडळासाठी काम केले आहे. त्यांनी प्रभारी प्राचार्य, राष्ट्रीय सेवा योजना, ॲडमिशन कमिटी, सांस्कृतिक कमिटी, विकास कमिटी व महाविद्यालयस्तरावर विविध सहलीचे आयोजन त्यांच्या पुढाकाराने हाेत हाेते. राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालयाचे वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख पद भूषवीत थायलंड, बँकॉक, श्रीलंका येथील कॉन्फरन्समध्ये सहभागी होऊन संशोधनाचे विविध कार्य उत्कृष्टपणे पार पाडले. यावेळी प्राचार्य मनोरंजन मंडल हाेते. संचालन प्रा. रमेश हलामी तर आभार प्रा. तानाजी मोरे यांनी मानले.

Web Title: Retired felicitation of Professor Vijay Khonde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.