पालकमंत्रीपदाची जबाबदारी वडेट्टीवारांकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 05:01 IST2020-04-17T05:00:00+5:302020-04-17T05:01:15+5:30
गडचिरोलीकरांकडून त्यांच्या नियुक्तीचे स्वागत होत आहे. गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे होते. ना.शिंदे हे ठाणे जिल्ह्याचे रहिवासी आहेत. परंतू कोरोनाचा वाढलेला प्रसार पाहता ना.शिंदे यांना गडचिरोली जिल्ह्याशी संपर्क ठेवणे कठीण झाले आहे.

पालकमंत्रीपदाची जबाबदारी वडेट्टीवारांकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राज्याचे मदत व पुनर्वसन, बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचीही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे गडचिरोलीकरांकडून त्यांच्या नियुक्तीचे स्वागत होत आहे.
गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे होते. ना.शिंदे हे ठाणे जिल्ह्याचे रहिवासी आहेत. परंतू कोरोनाचा वाढलेला प्रसार पाहता ना.शिंदे यांना गडचिरोली जिल्ह्याशी संपर्क ठेवणे कठीण झाले आहे. गडचिरोली या आदिवासीबहुल व मागास जिल्ह्यात लॉककडाऊनमुळे तेंदूपत्ता व इतर रोजगार हातून हिरावल्या गेल्यास येथील नागरिकांची मोठी अडचण होण्याची शक्यता आहे. ना.विजय वडेट्टीवार यांचे गडचिरोली जिल्ह्यासोबत लहानपणापासूनचे नाते आहे. ही बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी विजय वडेट्टीवार यांच्याकडे सोपविली आहे.
ही जबाबदारी तात्पुरती असली तरी त्यांच्याकडेच पुढेही ही जबाबदारी असल्यास गडचिरोलीवासियांच्या अनेक समस्या शासनस्तरावर सोडविण्यास मदत मिळेल, अशी अपेक्षा केली जात आहे.