लाेकप्रतिनिधी व सफाई कामगारांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:26 IST2021-07-16T04:26:16+5:302021-07-16T04:26:16+5:30
गडचिराेली नगर परिषदेत सफाई कर्मचारी व लोकप्रतिनिधींचा कोविड योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला, याप्रसंगी ते बाेलत हाेते. काेराेनाचा प्रादुर्भाव ...

लाेकप्रतिनिधी व सफाई कामगारांचा सत्कार
गडचिराेली नगर परिषदेत सफाई कर्मचारी व लोकप्रतिनिधींचा कोविड योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला, याप्रसंगी ते बाेलत हाेते. काेराेनाचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी उत्तम कार्य केल्याबद्दल नगराध्यक्ष योगिता पिपरे, उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, नगरसेविका वैष्णवी नैताम, रंजना गेडाम, लता लाटकर तसेच नीता लाटकर यांचा तसेच न.प. आरोग्य विभागाचे सफाई कर्मचारी, कामगार व मजुरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजप जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, देवाजी लाटकर, न.प.चे उपमुख्याधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
गडचिरोली हे जिल्हा मुख्यालय असल्याने येथे जिल्हा रुग्णालयाचे मोठे कोविड केंद्र आहे. शहरात कोविडचा धोकाही मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळे या ठिकाणी नगर परिषद प्रशासनाने कोविड नियंत्रणात आणण्यासाठी उत्तम उपाययोजना केल्या. आवश्यक ठिकाणी सॅनिटायझर फवारणी केली. मृतांवर अंत्यसंस्कार योग्यरीत्या पार पाडण्याकरिता नगर परिषद प्रशासनाने नियाेजन केेले. कोविड नियंत्रण उपाययोजना व जनजागृती मोहीम चांगल्या प्रकारे राबविली. त्याचबरोबर लसीकरण मोठ्या प्रमाणात व्हावे याकरितादेखील विशेष प्रयत्न केले. नगर परिषद प्रशासनाच्या या कार्याचा गौरव करण्यासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी, कामगार, मजूर व लोकप्रिनिधींचा कोविड योद्धा म्हणून सत्कार करीत असल्याचे प्रतिपादन आ. डॉ. देवराव होळी यांनी याप्रसंगी केले.
150721\15gad_1_15072021_30.jpg
नगरसेविकेचा सत्कार करताना आ. डाॅ. देवराव हाेळी, साेबत नगराध्यक्ष पिपरे.