ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सोडवू
By Admin | Updated: June 2, 2014 01:12 IST2014-06-02T01:12:25+5:302014-06-02T01:12:25+5:30
राज्याचे अधिवेशन सोमवारपासून सुरू होत असून या अधिवेशनात जिल्ह्यातील प्रलंबित

ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सोडवू
गडचिरोली : राज्याचे अधिवेशन सोमवारपासून सुरू होत असून या अधिवेशनात जिल्ह्यातील प्रलंबित समस्या मांडून त्या सोडविण्यासाठी आग्रह धरू, अशी माहिती गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी पत्रकार परिषदेत दिली. पिपरी रीठ येथील तलावाला १९ हेक्टर जमीन कमी पडल्याने सदर प्रकल्पाचे काम रखडले आहे. वैनगंगा नदीवरील कळमगाव बॅरेज व कोटगल बॅरेजचे कामाला वेग देण्यासाठी प्रयत्न करणे, धानोरा तालुक्यातील डुरकान, गुड्रा हा प्रकल्प वनजमिनीमुळे रखडला आहे. ओबीसींचे आरक्षण १९ टक्क्यांवरून सहा टक्के करण्यात आले आहे ते पूर्ववत करणे, ओबीसी कर्मचार्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करणे, ओबीसी विद्यार्थ्यांना सर्व अभ्यासक्रमाला १00 टक्के शिष्यवृत्ती मिळवून देणे, आदिवासी आo्रमशाळा तालुकास्तरावर सुरू करणे, आo्रमशाळांमध्ये ३0 टक्के इतर प्रवर्गाच्या मुलांना प्रवेश देणे, चामोर्शी, आष्टी व धानोरा येथे बसस्थानक सुरू करणे, गडचिरोली जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणात पोलिसांची भरती केली जाते. त्यामुळे या ठिकाणी आधुनिक ट्रेनिंग सेंटर निर्माण करण्यात यावे, खनिज संपत्तीवर उद्योगनिर्मितीसाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती दिली. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष हसनअली गिलानी, प्रभाकर वासेकर, बाबूराव बावणे, तालुकाध्यक्ष शंकर सालोटकर, नंदू वाईलकर, राऊत, नेताजी गावतुरे, तुळशीदास भोयर, उमेश कुमरे, मोटघरे आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)