शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

शिपाई पदभरतीतून डावलण्याचा डाव

By admin | Updated: July 29, 2014 23:49 IST

तालुक्यातील चांभार्डा ग्रामपंचायत अंतर्गत रिक्त असलेल्या शिपाई पदाची अनुसूचित जातीची जागा भरण्यासंदर्भात ग्रा. पं. च्यावतीने फेब्रुवारी महिन्यात आवेदनपत्र मागविले होते. परंतु सदर शिपाई भरती

कैलास कोरेवार यांचा आरोप : चांभार्डा ग्रा. पं. ने दुसऱ्यांदा मागविले आवेदन पत्रगडचिरोली : तालुक्यातील चांभार्डा ग्रामपंचायत अंतर्गत रिक्त असलेल्या शिपाई पदाची अनुसूचित जातीची जागा भरण्यासंदर्भात ग्रा. पं. च्यावतीने फेब्रुवारी महिन्यात आवेदनपत्र मागविले होते. परंतु सदर शिपाई भरती प्रक्रियेत ग्रामसेवकाची मनमानी झाल्याच्या आरोपावरून सदर शिपाई पदभरती प्रक्रिया काही दिवस स्थगीत ठेवण्यात आली. परंतु आता सर्वसाधारण प्रवर्गातून सरळ भरतीने रिक्त असलेले शिपायाचे पद भरण्यासंदर्भात आवेदनपत्र मागविण्यात आले आहे. त्यामुळे अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी ग्रामपंचायतच्या ठरावानुसार राखीव असलेले शिपायाचे पद पुन्हा सर्वसाधारण प्रवर्गातून भरले जात आहे. त्यामुळे सदर भरती प्रक्रियेपासून अनुसूचित जातीच्या उमेदवारांना डावलण्याचा ग्रामसेवक व पदाधिकाऱ्यांचा प्रयत्न आहे, असा आरोप कैलास कोरेवार यांनी केला आहे.चांभार्डा येथील ग्रा. पं. मधील पदोन्नतीने रिक्त झालेले शिपायाचे पद भरण्यासंदर्भात ७ फेब्रुवारी २०१४ पर्यंत अनुसूचित जाती संवर्गातून आवेदनपत्र मागविण्यात आले होते. त्यानंतर गावातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांसह इतरही उमेदवारांनी अर्ज सादर केले होते. परंतु ग्रामसेवकाने अनुसूचित जातीच्या ५ उमेदवारांना आकसापोटी अपात्र घोषित केले होते. त्यामुळे अन्यायग्रस्त अनुसूचित जातीच्या उमेदवारांनी जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता यांच्याकडे २४ फेब्रुवारी रोजी शिपाई पद भरतीत ग्रामसेवकाने केलेल्या अन्यायाचे निवारण करण्यासंदर्भात निवेदन सादर केले होते. ग्रामपंचायत सचिवाने अनुसूचित जातीचे उमेदवार उपलब्ध असतांनासुद्धा अन्य उमेदवाराची निवड रद्द करून शिपाई पदभरती प्रक्रिया अनुसूचित जाती संवर्गातूनच पुन्हा घेण्यात यावी, याबाबत विनंतीही सीईओकडे केली होती. बेकायदेशिर व नियमबाह्य ग्रामसेवकावर उचित कारवाई करण्याची मागणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे चांभार्डा येथील अनुसूचित जातीच्या उमेदवारांनी केली होती. परंतु चांभार्डा ग्रा. पं. च्यावतीने शिपाई पदाच्या भरतीकरिता २ आॅगस्ट २०१४ पर्यंत सर्वसाधारण प्रवर्गातून आवेदनपत्र मागविण्यात आले आहे. त्यामुळे ग्रा. पं. ने शिपाई पदाच्या भरतीकरिता पूर्वी घेतलेला अनुसूचित जाती उमेदवाराची भरती करण्याचा ठराव असतांनाही अनुसूचित जातीच्या उमेदवारांना शिपाई पदापासून वंचित ठेवण्याचा ग्रामसेवकाचा डाव असल्याचा आरोप कोरेवार यांनी केला आहे. यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदनही सादर केले जाईल, असे कैलास कोरेवार यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले.