पोर्लाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यावर गुन्हा नोंदवा

By Admin | Updated: June 19, 2014 23:51 IST2014-06-19T23:51:11+5:302014-06-19T23:51:11+5:30

पोर्ला आरोग्य केंद्राचा विद्युत पुरवठा खंडित झाला. तो सुरू करण्यासाठी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नारायण करेवार यांनी आशीष अण्णाजी झोडगे याला बोलाविले व सुरू असलेल्या वीज पुरवठ्यावर काम

Report an offense to the Petrol Medical Officer | पोर्लाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यावर गुन्हा नोंदवा

पोर्लाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यावर गुन्हा नोंदवा

मृतकाच्या भावाची मागणी : डॉक्टरच मृत्यूला जबाबदार
गडचिरोली : पोर्ला आरोग्य केंद्राचा विद्युत पुरवठा खंडित झाला. तो सुरू करण्यासाठी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नारायण करेवार यांनी आशीष अण्णाजी झोडगे याला बोलाविले व सुरू असलेल्या वीज पुरवठ्यावर काम करण्यास सांगितले. त्यामुळे आशिषचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. या घटनेला डॉ. करेवार जबाबदार आहेत, असा आरोप मृतकाचा भाऊ डंबाजी अण्णाजी झोडगे यांनी केला आहे.
या संदर्भात खासदार अशोक नेते यांना दिलेल्या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, २६ मे २०१४ ला सकाळी १० वाजता पोर्ला आरोग्य केंद्राचा वीज पुरवठा खंडित झाला होता. तो सुरू करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. करेवार यांनी आशिष झोडगे याला फोन करून बोलाविले व वीज पुरवठा सुरू करण्यास सांगितले. त्यावेळी वीज प्रवाह सुरू होता. विजेचे काम करीत असताना शॉक लागल्याने आशिष खांबावरच लोंबकळत राहिला. त्याचे पूर्ण अंग भाजून गेले होते. त्याला उपचारासाठी गडचिरोली सामान्य रूग्णालयात भरती करण्यात आले. परंतु त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्याला उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले. तेथे त्याचा मृत्यू झाला. आशिषच्या या मृत्यूला पोर्ला आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नारायण करेवार हे जबाबदार आहेत. त्यांच्यावर गडचिरोली पोलिसांनी आशिषच्या मृत्यूला जबाबदार असल्यावरून फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मृतकाचा भाऊ डंबाजी अण्णाजी झोडगे यांनी केली आहे. गावात लाईनमन स्वत:चे काम करीत नाही. त्यामुळे गावातील अप्रशिक्षीत लोकांकडून विद्युत दुरूस्तीचे जोखमीचे काम करवून घेतले जातात. आरोग्य केंद्रासारख्या सरकारी संस्थेत लाईनमनला बोलावून दुरूस्तीचे काम व्हायला हवे. ही जबाबदारी डॉ. करेवार यांची होती. परंतु त्यांनी अप्रशिक्षीत व्यक्तीकडून काम करवून घेतल्याने ते या प्रकरणात दोषी आहे, असे तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे.

Web Title: Report an offense to the Petrol Medical Officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.