‘ती’ वाघीण नरभक्षक नसल्याचा समितीचा अहवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:48 IST2017-08-21T00:48:35+5:302017-08-21T00:48:52+5:30
देसाईगंज व आरमोरी तालुक्यात धुमाकूळ घातलेल्या वाघीणीला वन विभागाने जेरबंद केल्यानंतर नागपुर येथील गोरेवाडा येथे हलविण्यात आले.

‘ती’ वाघीण नरभक्षक नसल्याचा समितीचा अहवाल
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईग्ांज : देसाईगंज व आरमोरी तालुक्यात धुमाकूळ घातलेल्या वाघीणीला वन विभागाने जेरबंद केल्यानंतर नागपुर येथील गोरेवाडा येथे हलविण्यात आले. वनविभागााने पकडलेली वाघीण नरभक्षक आहे किंवा नाही याची शहानिशा करण्यासाठी तज्ज्ञाची समिती ठरविण्यात आली होती. या समितीने जेरबंद केलेली वाघीण नरभक्षक नसल्याचे समितीने ठरविले आहे. यामुळे परिसरात मानवाची शिकार केलेल्या वाघाला पकडण्यासाठी पुन्हा वनविभागाला प्रयत्न करावे लागणार आहेत.
देसाईग्ांज तालुक्यातील कोंढाळा व आरमोरी तालुक्यातील रवी व आरसोडा या भागात नरभक्षक वाघाने दोन नागरिक व पाळीव जनावरांची शिकार केल्यामुळे संपूर्ण परीसर वाघाच्या दहशतीत होते. वाघ पकडण्यासाठी वनविभागाने सर्वप्रकारचे प्रयत्न चालविले होते. वन विभागाच्या सततच्या प्रयत्नाअंती १२ आॅगस्ट रोजी वाघाला पकडण्यात यश प्राप्त झाले. मात्र पकडलेला वाघ नसुन वाघीन असल्याचे स्पष्ट झाले. परिसरात नर व मादा वाघ असल्याचे वनविभागाने आधिच स्पष्ट केले होते. पकडलेल्या वाघीणीला वनविभागाने नागपूर येथील गोरेवाडा पाठविण्यात आले. वाघीनीची देखरेख करण्यासाठी राज्य स्तरीय समिती स्थापन करण्यात आली. यामध्ये नागपूर येथील पशुवैद्यकिय महाविद्यालयाचे सहा प्रमुख डॉ.एन.एन. झाडे, उपविभागीय वनअधिकारी एस.बी. फुले, उत्तम सावंत, जी. के वशिष्ठ, नंदकिशोर काळे, सामपुडा फाउंडेशनचे प्रमुख किशोर रिठे, डॉ. विनोद धुत, डॉ.ए. डी. कलकुटे आणि जिल्हा वन्यजीव अधीक्षक कुंदन हाटे समितीत होते. स्थापन केलेल्या समितीने वाघीनी बाबतचा अहवाल राज्य शासनाकडे सादर केला आहे. अहवालात जेरबंद केलेली वाघीण उत्तम अवस्थेत असून तिच्या नैसर्गिक अधिवासात सोडले जावे तसेच ती नरभक्षक नसल्याचे देखील अहवालात नमुद करण्यात आले आहे. देसाईग्ांज व आरमोरी तालुक्यात वाघाने लवाजी मेश्राम व वामन मराप्पा यांना वाघाने ठार केले. त्यामुळे शिकार केलेल्या ईसमांना वाघाने मारले असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. वाघीणीला पकडण्यासाठी वनविभागाला दोन महिन्याचा कालावधी लागला होता. आता पुन्हा वाघाला पकडण्यासाठी लागणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. नरभक्षक वाघ रवी गावाच्या जंगलात कायम असल्याने या वाघाकडून नागरिकांवर आणखी हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही.