दोन न.पं.सभापतींची फेरनिवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 12:57 AM2017-12-02T00:57:58+5:302017-12-02T00:58:29+5:30

जिल्ह्यातील एटापल्ली व अहेरी नगर पंचायतींच्या विषय समिती व स्थायी समितीच्या निवडणूक कार्यक्रमानुसार ३० नोव्हेंबरला विषय समिती व स्थायी समितीची निवडणूक प्रक्रिया पार पडली.

Repeat of two GPRs | दोन न.पं.सभापतींची फेरनिवड

दोन न.पं.सभापतींची फेरनिवड

Next
ठळक मुद्देविषय समिती व स्थायी समिती : एटापल्ली व अहेरीत निवडणूक प्रक्रिया

ऑनलाईन लोकमत 
एटापल्ली/अहेरी : जिल्ह्यातील एटापल्ली व अहेरी नगर पंचायतींच्या विषय समिती व स्थायी समितीच्या निवडणूक कार्यक्रमानुसार ३० नोव्हेंबरला विषय समिती व स्थायी समितीची निवडणूक प्रक्रिया पार पडली. यात काही सदस्यांची फेर निवड तर काही सदस्यांची नव्याने निवड करण्यात आली.
१७ सदस्यांचे संख्याबळ असलेल्या एटापल्ली नगर पंचायतीत राकाँचे ३, भाजपचे ५, काँग्रेसचे ७, आविसंचा व अपक्ष प्रत्येकी १ सदस्य आहेत. यापैैकी भाजपच्या एका नगरसेविकेचे सदस्यत्त्व जात पडताळण्ीाच्या कारणाने रद्द करण्यात आले. त्यामुळे नगर पंचायतीत १६ सदस्य आहेत. गुरूवारी पार पडलेल्या विषय समितीच्या निवडणुकीत पाणीपुरवठा व जलनि:सारण समितीच्या सभापती पदाकरिता काँग्रेसचे जितेंद्र दशरथ टिकले व भाजपचे दीपक सोनटक्के उभे होते. बांधकाम सभापती पदाकरिता काँग्रसेचे किसन झुरू हिचामी व भाजपच्या सुनिता मोहन चांदेकर उभ्या होत्या. या निवडणुकीत दोन्ही पदाकरिता काँग्रेसला १० व भाजपला ६ अशी मते मिळाली. पाणीपुरवठा सभापतीपदी टिकले व बांधकाम सभापतीपदी किसन हिचामी निवडून आले. तर उपाध्यक्ष रमेश गंपावार यांच्याकडे स्वच्छता व आरोग्य सभापतीपद कायम ठेवण्यात आले. विशेष म्हणजे महिला व बांधकाम सभापती पदासाठी कोणत्याच सदस्याने अर्ज न सादर केल्याने सदर पद रिक्त आहे.
या निवडणुकीसाठी पिठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, सहायक निवडणूक अधिकारी म्हणून नायब तहसीलदार सत्यनारायण सिलमवार यांनी काम पाहिले. यावेळी कर्मचारी उपस्थित होते.
अहेरीत स्थायी समितीची निवड
अहेरी नगर पंचायतीच्या विषय समिती व स्थायी समितीची निवडणूक घेण्यात आली. महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापतीपदी ममता शैलेंद्र पटवर्धन यांची अविरोध निवड करण्यात आली. तसेच स्थायी समितीचेही गठन करण्यात आले. स्थायी समितीच्या सभापतीपदी नगराध्यक्ष प्राजक्ता पेदापल्लीवार, तर सदस्यपदी बांधकाम सभापती न. पं. उपाध्यक्ष अन्नपूर्णा सिडाम, महिला व बालकल्याण समिती सभापती अर्चना विरगोनवार, स्वच्छता व आरोग्य समिती सभापती नारायण सिडाम, पाणीपुरवठा व जलनि:सारण समिती सभापती स्मिता येमुलवार यांची निवड करण्यात आली. पिठासीन अधिकारी म्हणून सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी एस. ओंबासे, सहायक पिठासीन अधिकारी म्हणून मुख्याधिकारी यांनी काम पाहिले.

Web Title: Repeat of two GPRs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.