खड्डेमय अंतर्गत रस्ते दुरूस्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2016 01:54 IST2016-07-23T01:54:56+5:302016-07-23T01:54:56+5:30

शहरातील अंतर्गत रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडून दुरवस्था झाली आहे. परिणामी रस्त्यावरून आवागमन करताना नागरिकांना प्रचंड...

Repair the roads in the puddle | खड्डेमय अंतर्गत रस्ते दुरूस्त करा

खड्डेमय अंतर्गत रस्ते दुरूस्त करा

अहेरी कृती समितीची मागणी : पालकमंत्र्यांना आंदोलनाचा इशारा
अहेरी : शहरातील अंतर्गत रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडून दुरवस्था झाली आहे. परिणामी रस्त्यावरून आवागमन करताना नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. जनतेच्या सुविधेकरिता येथील अंतर्गत रस्ते तत्काळ दुरूस्त करावे, अन्यथा अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीच्या वतीने येथील गांधी चौकात रास्तारोको आंदोलन करू, असा इशारा कृती समितीच्या वतीने गुरूवारी तहसीलारांमार्फत पालकमंत्र्यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
अहेरीतील गांधी चौक ते एस. बी. महाविद्यालय, बसस्थानक मार्ग, रूग्णालय मार्गाची दुरवस्था झाली आहे. यामुळे सदर मार्ग तत्काळ दुरूस्त करावे. शिवाय अहेरी शहरातील वीज पुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने पावसाळ्याच्या दिवसात नागरिकांना डासांच्या प्रकोपाचा सामना करावा लागत आहे. दिवसभरातून अनेकदा वीज पुरवठा खंडीत होतो. त्यानंतर तो दीर्घ कालावधीनंतर सुरळीत होतो. त्यामुळे रस्ते व वीज समस्या सोडवावी, अन्यथा कृती समितीच्या वतीने रास्तारोको आंदोलन करू, असा इशारा समितीचे अध्यक्ष रघुनाथ तलांडे, डॉ. ढेंगळे यांनी दिला आहे.

Web Title: Repair the roads in the puddle