पूर ओसरताच कंबलपेठा पुलाची दुरूस्ती सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 05:00 IST2020-08-25T05:00:00+5:302020-08-25T05:00:54+5:30

सिरोंचा तालुका मुख्यालयापासून २६ किमी अंतरावर असलेल्या कंबलपेठा परिसरात जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. या नाल्यावर पाईप टाकून पूल बांधण्यात आला आहे. पुलाची उंची अतिशय कमी आहे. त्यामुळे थोडा जरी पाऊस झाला तरी या पुलावरून पाणी वाहण्यास सुरूवात होते. पुलावरून पाणी असतानाही काही नागरिक प्रवास करतात. मात्र गढूळ पाण्यामुळे पुलावरील खड्डा लक्षात येत नाही.

Repair of Kambalpetha bridge started as soon as the flood receded | पूर ओसरताच कंबलपेठा पुलाची दुरूस्ती सुरू

पूर ओसरताच कंबलपेठा पुलाची दुरूस्ती सुरू

ठळक मुद्देलोकमतने वेधले लक्ष : खड्डे पडल्याने वाहतूक होती ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : आठ दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे कंलपेठा गावाजवळ असलेल्या नाल्यावरचे पूल वाहून गेले. पुलावर मोठमोठे खड्डे पडले होते. या पुलावरून प्रवास करणे धोकादायक असल्याने प्रशासनाने याची दखल घेत सोमवारपासून पूल दुरूस्तीच्या कामाला सुरूवात झाली आहे.
सिरोंचा तालुका मुख्यालयापासून २६ किमी अंतरावर असलेल्या कंबलपेठा परिसरात जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. या नाल्यावर पाईप टाकून पूल बांधण्यात आला आहे. पुलाची उंची अतिशय कमी आहे. त्यामुळे थोडा जरी पाऊस झाला तरी या पुलावरून पाणी वाहण्यास सुरूवात होते. पुलावरून पाणी असतानाही काही नागरिक प्रवास करतात. मात्र गढूळ पाण्यामुळे पुलावरील खड्डा लक्षात येत नाही. अशा परिस्थितीत एखादा नागरिक खड्ड्यात पडून त्याचा जीव जाण्याचा धोका होता. याबाबत लोकमतने सातत्याने पाठपुरावा करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. प्रशासनाने दखल घेत सोमवारपासून कंबलपेठा नाल्यावरील पूल दुरूस्तीच्या कामाला सुरूवात केली आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत हे काम केले जात आहे. कंलपेठा परिसरात अनेक गावे आहेत. पुलाची दुरूस्ती होणार असल्याने सर्व गावांसाठी आता सोयीचे झाले आहे.

पुलासाठी प्रस्ताव सादर
कंबलपेठा नाल्यावरील पुलाची गरज लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलासाठीचा प्रस्ताव मुख्य अभियंता नागपूर यांच्याकडे २० ऑगस्ट रोजी सादर केला आहे. १४ कोटी रुपये पुलाची अंदाजित किंमत राहणार आहे, अशी माहिती अभियंता एकनाथ टिकले यांनी दिली. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी प्रस्ताव मंजुरीसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

Web Title: Repair of Kambalpetha bridge started as soon as the flood receded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.