गडचिरोलीतील अंतर्गत रस्ते दुरूस्त करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 00:40 IST2018-07-20T00:39:54+5:302018-07-20T00:40:38+5:30
पावसामुळे शहरातील अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. सदर रस्ते दुरूस्त करण्यात यावेत, अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी ओहोड यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

गडचिरोलीतील अंतर्गत रस्ते दुरूस्त करा
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : पावसामुळे शहरातील अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. सदर रस्ते दुरूस्त करण्यात यावेत, अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी ओहोड यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
शहरातील अंतर्गत रस्त्यांवर मुरूम टाकावा, आयटीआय चौक ते जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानाकडे जाणाºया मार्गांवरील खड्डे बुजवून या मार्गाचे डांबरीकरण करावे, हनुमान वॉर्ड, सुभाष वॉर्ड परिसरातील जनतेला पुरेसा पाणीपुरवठा करावा, डुकरांचा बंदोबस्त करावा, शहरातील नाल्यांचा उपसा नियमित करावा, घरकुलाचा लाभ घेण्यासाठी आवास योजनेत असलेल्या अटी शिथील कराव्या, मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, चारही मुख्य मार्गावर रस्ता दुभाजकाच्या सुरुवातीला मोठे रिफ्लेक्टर लावावे, हायमॉस्ट लाईट लावावे, विसापूर येथे ३५ लाख लीटर पाण्याची टाकी उभारावी, आयटीआय ते गोकूलनगरदरम्यान झालेल्या निकृष्टी कामाची चौकशी करावी, शहरातील पथदिवे बंद पडल्यास त्या ठिकाणी नवीन पथदिवे लावावे, सफाई कामगारांच्या आरोग्याचे हित लक्षात घेऊन या कामगारांना रेनकोट व मोजे उपलब्ध करून द्यावे आदी मागण्या निवेदनातून केल्या आहेत.
निवेदन देतेवेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आ.डॉ.नामदेव उसेंडी, शहराध्यक्ष तथा नगरसेवक सतीश विधाते, युवक काँग्रेसचे लोकसभा अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, रजनीकांत मोटघरे, पी.टी.मसराम, एजाज शेख आदी उपस्थित होते. काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी ओहोड यांच्यासोबत चर्चा केली. निवेदनात मांडलेल्या समस्या सोडविण्याचे आश्वासन मुख्याधिकाºयांनी शिष्टमंडळाला दिले.