निधीसाठी थांबला मार्र्कंडेश्वर मंदिराचा जिर्णोद्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 05:00 AM2020-08-17T05:00:00+5:302020-08-17T05:00:46+5:30

मार्र्कंडा देवस्थानचे पदाधिकारी व पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी खा.नेते होते. याशिवाय जिल्हाधिकारी दीपक सिंगला, पुरातत्त्व विभागाचे अधिकारी प्रशांत शिंदे, भाजपच्या अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रकाश गेडाम, महिला आघाडीच्या रेखा डोळस, मार्र्कंडा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गजानन भांडेकर, सचिव मृत्यूंजय गायकवाड आदी उपस्थित होते.

Renovation of Markandeshwar Temple stopped for funds | निधीसाठी थांबला मार्र्कंडेश्वर मंदिराचा जिर्णोद्धार

निधीसाठी थांबला मार्र्कंडेश्वर मंदिराचा जिर्णोद्धार

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालयात बैठक : पाठपुरावा करण्याची पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाºया चामोर्शी तालुक्याच्या मार्र्कंडेश्वर देवस्थानच्या जीर्णोद्धाराचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. मात्र निधीअभावी हे बांधकाम अद्यापही पूर्ण झाले नाही. यावर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत मंथन करण्यात आले. निधीसाठी अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करावा, अशी सूचना यावेळी खा.अशोक नेते यांनी केली.
मार्र्कंडा देवस्थानचे पदाधिकारी व पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी खा.नेते होते. याशिवाय जिल्हाधिकारी दीपक सिंगला, पुरातत्त्व विभागाचे अधिकारी प्रशांत शिंदे, भाजपच्या अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रकाश गेडाम, महिला आघाडीच्या रेखा डोळस, मार्र्कंडा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गजानन भांडेकर, सचिव मृत्यूंजय गायकवाड आदी उपस्थित होते.
याप्रसंगी मार्र्कंडेश्वर देवस्थान बांधकामाचा आढावा घेण्यात आला. या बांधकामाबाबतचा प्रस्ताव २०१५ मध्ये तयार करून तो शासनाकडे पाठविण्यात आला होता. सन २०१७ मध्ये या कामासाठी २ कोटी १४ लाख ९ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. यापैैकी आतापर्यंत १ कोटी ७ लाख रुपयांचा निधी शासनाकडून प्राप्त झाला आहे. जीर्णोद्धाराच्या आतापर्यंतच्या कामासाठी हा निधी खर्च झाला आहे.
उर्वरित १ कोटी ७ लाख रुपयांचा निधी शासनाकडून उपलब्ध न झाल्याने मंदिर जीर्णोद्धाराचे पुढील काम थांबले असल्याची माहिती पुरातत्त्व विभागाचे अधिकारी प्रशांत शिंदे यांनी बैठकीत दिली.
मार्र्कंडा देवस्थानाच्या जीर्णोद्धाराचे काम लवकर पूर्णत्वास जाण्यासाठी तसा प्रस्ताव पाठवून पुरातत्त्व विभागाच्या अधिकाºयांनी पाठपुरावा करावा, अशा सूचना खा.नेते यांनी बैठकीत दिल्या. बैठकीला मार्र्कंडेश्वर देवस्थानचे ट्रस्टचे सदस्य उपस्थित होते.

Web Title: Renovation of Markandeshwar Temple stopped for funds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.