तिगलगुडमच्या आबादी जमिनीवरील अतिक्रमण हटवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:38 IST2021-07-30T04:38:25+5:302021-07-30T04:38:25+5:30
निवेदनात म्हटले आहे की, ग्रामपंचायत मेडारमअंतर्गत तिगलगुडम हे गाव आहे. हे गाव वन ग्राम म्हणून शासनाने घोषित ...

तिगलगुडमच्या आबादी जमिनीवरील अतिक्रमण हटवा
निवेदनात म्हटले आहे की, ग्रामपंचायत मेडारमअंतर्गत तिगलगुडम हे गाव आहे. हे गाव वन ग्राम म्हणून शासनाने घोषित केले आहे. त्यानुसार या गावांसाठी राखीव ६५.६३ हे.आर.जमीन दिली. सदर जमिनीवर मेडारम, नारायणपूर व इतर गावांतील लोकांनी अतिक्रमण केले आहे. सध्या तिगलगुडम येथील काही नागरिकांकडे शेतजमीन नाही. वनावर आधारित कामे करून उपजीविका करावी लागत आहे. पेसाअंतर्गत या जमिनीवर आम्हा आदिवासी लोकांचा हक्क आहे. त्यामुळे सदर जमिनीवरील अतिक्रमण हटवून वनहक्क पट्टे मिळवून द्यावे, अशी मागणी बापू तगडी, बापूचंद्र रेड्डी, किष्टया सिडाम, संतोष सिडाम, लसमया तुगडी, बाबुराव मडावी, बाबूलक्ष्मी गावडे, जगदीश मडावी, शंकर तगडी, महेश बागला, मलक्का रेड्डी यांनी केली. निवेदन प्रभारी तहसीलदार प्रकाश पुपालवार यांनी स्वीकारले.