काेराेनाग्रस्तांचे पाेट भरणाऱ्यांना आठ महिन्यांनंतर दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 05:00 IST2021-05-05T05:00:05+5:302021-05-05T05:00:05+5:30

बाॅक्स ....... काय दिले जाते जेवणात - गडचिराेली येथील रुग्णालय व काेविड केअर सेंटरमध्ये पुरविण्यात येत असलेल्या जेवणाचा दर्जा ...

Relief after eight months for those who pay for the carnage | काेराेनाग्रस्तांचे पाेट भरणाऱ्यांना आठ महिन्यांनंतर दिलासा

काेराेनाग्रस्तांचे पाेट भरणाऱ्यांना आठ महिन्यांनंतर दिलासा

बाॅक्स .......

काय दिले जाते जेवणात

- गडचिराेली येथील रुग्णालय व काेविड केअर सेंटरमध्ये पुरविण्यात येत असलेल्या जेवणाचा दर्जा चांगला आहे. जेवणाबाबत नागरिकांच्या फारशा तक्रारी नाहीत. सकाळी चहा, नाश्ता, दाेन अंडी, एक फळ व रस दिले जाते. दुपारी १ वाजता जेवण, ४ वाजता काढा, रात्री ७ वाजता जेवण दिल्या जाते.

- ग्रामीण भागातील अनेक काेविड केअर सेंटरवर मात्र निकृष्ट दर्जाचे जेवण देत असल्याच्या रुग्णांच्या तक्रारी आहेत, तसेच पुरेसे जेवणसुद्धा दिले जात नाही. संबंधित कंत्राटदारांकडे लक्ष देण्याची गरज आहे.

काेट ...

मी सध्या जिल्हा रुग्णालयात मागील चार दिवसांपासून भरती आहे. रुग्णालयातीलच जेवण करत आहे. जेवणाचा दर्जा चांगला आहे; मात्र अतिशय गरम अन्न प्लास्टिकमध्ये पॅक केले जात असल्याने या अन्नाला काही प्रमाणात प्लास्टिकचा वास येतेा. अन्न थाेडे थंड झाल्यानंतर प्लास्टिकमध्ये भरल्यास प्लास्टिकचा वास येणार नाही. याकडे कंत्राटदाराने लक्ष देण्याची गरज आहे. - काेराेना रुग्ण.

काेट......

मागील चार दिवसांपासून धानाेरा काेविड केअर सेंटरमध्ये भरती आहे; मात्र जेवणाचा दर्जा पाहिजे तसा चांगला नाही. पुरेसे जेवणसुद्धा दिले जात नाही. ग्रामीण भागातील नागरिक तक्रार करीत नाहीत, याचा गैरफायदा कंत्राटदार घेत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.- काेराेना रुग्ण.

बाॅक्स .....

एकूण काेविड केअर सेंटर - १८

एकूण भरती रुग्ण - १५३८

Web Title: Relief after eight months for those who pay for the carnage