साडेचार लाखांचा दंड वसूल
By Admin | Updated: November 19, 2015 02:02 IST2015-11-19T02:02:23+5:302015-11-19T02:02:23+5:30
मुदतबाह्य परवाना तपासणी मोहीम यासह विविध कारवाया करीत गडचिरोली उपप्रादेशिक परिवहन

साडेचार लाखांचा दंड वसूल
उपप्रादेशिक परिवहन विभागाची मोहीम : एका महिन्यात वाहनधारकांवर कारवाई
गोपाल लाजूरकर गडचिरोली
मुदतबाह्य परवाना तपासणी मोहीम यासह विविध कारवाया करीत गडचिरोली उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने एका महिन्यात एकूण १२८ वाहनांची तपासणी करीत एकूण ४ लाख ५५ हजार ७८ रूपयांचा दंड वसूल केला. त्यामुळे अवैधरीत्या वाहने बाळगणाऱ्या व चालविणाऱ्यांना मोठा चाप उपप्रादेशिक परिवहन विभागाने दिला आहे.
ंउपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने आॅक्टोबर ते १७ नोव्हेंबर या एक महिन्याच्या कालावधीत एकूण १२८ वाहनांची तपासणी करण्यात आली. मोहिमेत परवाना मुदतबाह्य झालेल्या १३ आॅटोरिक्षा आढळून आल्या. तसेच एक खासगी आॅटोरिक्षा, ४७ इतर वाहने असे एकूण ६१ वाहने दोषी आढळून आले. वाहने दोषी आढळल्यानंतर उपप्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई करीत ३८ वाहने जप्त केली. त्यानंतर एकूण दोषी वाहनांपैकी ५३ वाहनांची प्रकरणे निकाली काढण्यात आली. वाहनधारकांकडून ३ लाख १७ हजार ८०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर १ लाख ३७ हजार २२८ रूपयांची कर वसुली करण्यात आली. अशी एकूण ४ लाख ५५ हजार ७८ रूपयांची दंड वसुली वाहनधारक व मालकांकडून करण्यात आली. एकूणच उपप्रादेशिक परिवहन विभागाने कारवायांसाठी विशेष पुढाकार घेतला आहे.