४० लाख वसूल

By Admin | Updated: December 29, 2014 01:25 IST2014-12-29T01:25:12+5:302014-12-29T01:25:12+5:30

जिल्हा व तालुका महसूल विभागाने अवैध गौण खनिजाची चोरट्या मार्गाने वाहतूक करणाऱ्यांकडून १ एप्रिल ते ३० नोव्हेंबरपर्यंत ...

Recovering 40 million | ४० लाख वसूल

४० लाख वसूल

दिलीप दहेलकर गडचिरोली
जिल्हा व तालुका महसूल विभागाने अवैध गौण खनिजाची चोरट्या मार्गाने वाहतूक करणाऱ्यांकडून १ एप्रिल ते ३० नोव्हेंबरपर्यंत ९ महिन्याच्या कालावधीत ४५४ प्रकरणातून ४० लाख २५ हजार २५१ रूपये दंड वसूल केला. यामुळे जिल्ह्यातील रेती व अन्य गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतूक करणाऱ्या तस्करांचे धाबे दणाणले आहे.
जिल्हा खनिकर्म विभागाच्यावतीने गतवर्षी २०१३-१४ या वर्षात जिल्ह्यातील एकूण ७० घाटांना पर्यावरण विभागाच्या मान्यतेनंतर मंजुरी प्रदान केली होती. ई-निविदा प्रक्रिया पार पाडून रेतीघाटांचा लिलाव करण्यात आला. या लिलावात ८७ पैकी ३१ रेती घाटांची विक्री झाली. जाचक अटीमुळे रेती कंत्राटदारांनी रेती घाटांकडे पाठ फिरविली होती. यामुळे चोरट्या मार्गाने रेतीचे अवैध उत्खनन व वाहतूक करण्याचे प्रमाण वाढले. त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली बाराही तालुक्यातील तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी आदी महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वर्षभर रेतीच्या अवैध उत्खनन व वाहतुकीबाबत धाडसत्र राबविले. यामुळे जिल्हा खनिकर्म विभागाला दंडाच्या रूपात ४५४ प्रकरणातून ९ महिन्यांच्या कालावधीत ४० लाख २५ हजार २५१ रूपयाचा महसूल मिळाला.
गडचिरोली जिल्ह्यात एकूण ६ महसूल विभाग असून यात बारा तालुक्यांचा समावेश आहे. या सर्व उपविभागातील रेती व अन्य गौणखनिजाचे अवैध उत्खनन व वाहतूक करणाऱ्या तस्करांवर करडी नजर ठेवून या अवैध मार्गाला आळा घालण्याचे काम महसूल अधिकारी व कर्मचारी करतात. १ एप्रिल ते सप्टेंबर २०१४ अखेरपर्यंतच्या ८ महिन्यांच्या कालावधीत सहाही उपविभागात महसूल अधिकाऱ्यांनी एकूण ३७५ धाडी घातल्या. यात सर्वाधिक गडचिरोली तालुक्यात १०३ त्या खालोखाल देसाईगंज तालुक्यात ५९, अहेरी तालुक्यात ५२, धानोरा तालुक्यात ४९, आरमोरी तालुक्यात २० धाडी टाकून महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रेती तस्करांवर दंडात्मक कारवाई केली.

Web Title: Recovering 40 million

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.