चार महिन्यातील सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:38 IST2021-04-07T04:38:05+5:302021-04-07T04:38:05+5:30

आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ११ हजार १९८ झाली आहे. त्यापैकी १० हजार ३७८ जणांनी कोरोनावर मात केली. सध्या ७०२ ...

Record of the highest number of coronaviruses in four months | चार महिन्यातील सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद

चार महिन्यातील सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद

आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ११ हजार १९८ झाली आहे. त्यापैकी १० हजार ३७८ जणांनी कोरोनावर मात केली. सध्या ७०२ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.६८ टक्के, तर मृत्युदर १.०५ टक्के झाला आहे. नवीन १४८ बाधितांमध्ये गडचिरोलीतील ३६, अहेरी १५, आरमोरी ८, चामोर्शी २२, भामरागड २१, धानोरा तालुक्यातील ६, एटापल्ली २, कोरची ५, कुरखेडा ७, मुलचेरा ५, सिरोंचा ७, तर देसाईगंज तालुक्यातील १५ जणांचा समावेश आहे. कोरोनामुक्त झालेल्या ५६ रुग्णांमध्ये गडचिरोलीमधील १७, अहेरी १०, आरमोरी ३, भामरागड १, चामोर्शी २, धानोरा १, एटापल्ली २, कुरखेडा १, तर देसाईगंजमधील १९ जणांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील शासकीय ६७ आणि खासगी २ अशा मिळून ६९ बुथवर पहिला लसीकरणाचा डोज २,२७४ तर दुसरा डोज २९९ नागरिकांना देण्यात आला. आतापर्यंत एकूण ३६,३३५ जणांना पहिला तर ९,९९६ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.

Web Title: Record of the highest number of coronaviruses in four months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.