१ कोटी ३७ लाखांच्या कामांना मान्यता
By Admin | Updated: October 27, 2014 22:35 IST2014-10-27T22:35:29+5:302014-10-27T22:35:29+5:30
सन २०१४- १५ या आर्थिक वर्षासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या रस्ते, गटारे व अन्य मूलभूत सुविधांच्या १ कोटी ३७ लाख रूपयांच्या कामांना १९ आॅक्टोबर रोजी राज्याच्या ग्रामविकास

१ कोटी ३७ लाखांच्या कामांना मान्यता
गडचिरोली : सन २०१४- १५ या आर्थिक वर्षासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या रस्ते, गटारे व अन्य मूलभूत सुविधांच्या १ कोटी ३७ लाख रूपयांच्या कामांना १९ आॅक्टोबर रोजी राज्याच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाने मान्यता प्रदान केली आहे. सदर मंजूर कामे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून होणार आहेत.
गडचिरोली तालुक्यात पारडी येथे ५ लाख रूपयांचे सिमेंट काँक्रिट रस्ता, इंदाळा येथे ५ लाख रूपयांचे सिमेंट काँक्रिट रस्ता व नाली बांधकाम, नवेगाव (मुरखळा) ५ लाख रूपयांचे नाली बांधकाम व मेंढा येथे ५ लाख रूपयांचे नालीबांधकाम आदी कामांचा समावेश आहे.
चामोर्शी तालुक्यात नवरगावनजिकच्या बांधोणा येथे ५ लाख रूपयांचा सिमेंटरस्ता, गिलगाव येथे ५ लाख रूपयांचा सिमेंट काँक्रिट रस्त्याचे काम होणार आहे. धानोरा तालुक्यात सोडे, गट्टा, गोडलवाही, आष्टी आदी चार ठिकाणी प्रत्येकी पाच लाख रूपयांचे सिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकाम होणार आहे. सिरोंचा तालुक्यात सोनमप, जानमप, पातागुड्डम, कोर्ला, कोपेला, बोरी, राजपूर, आष्टी आदी आठ गावांमध्ये प्रत्येकी पाच लाख रूपयांचे सिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकाम होणार आहे. अहेरी तालुक्यात बोरी, राजपूर आदी गावांत सिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकाम होणार आहे. मुलचेरा तालुक्यात मोऱ्हाली, देशबंधूग्राम आदी गावांत सिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकाम होणार आहे. कुरखेडा तालुक्यात सावलखेडा येथे सिमेंट काँक्रिट रस्ता तसेच कुरखेडा येथे जुन्या बसस्थानकाजवळ महिला शौचालय बांधकाम व गुरूनोली येथे मुख्य रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम होणार आहे.
अहेरी तालुक्यात आलापल्ली येथे सिमेंट काँक्रिट रस्ता, मेडपल्ली येथे सिमेंट काँक्रिट रस्याचे काम होणार आहे.
सदर मंजूर कामासाठी देण्यात येणार निधी हा मंजूर कामाच्या यादीसह मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांच्याकडे उपलब्ध करून देण्यात येईल. या कामांसाठी ३ मे २०११ च्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी, निविदा काढणे, स्वीकारणे आदी बाबतची कार्यवाही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच संबंधित सर्व ग्रामपंचायतीची राहील, असेही २६ आॅगस्ट २०१४ च्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या शासन निर्णयात नमुद आहे.
२५१५ अंतर्गत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात विकास कामे होणार असल्याने गावाचा विकास साधण्यास मदत होणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)े