५.५ क्विंटल धान्यासह रेशन दुकानदारास अटक
By Admin | Updated: May 10, 2014 02:32 IST2014-05-10T00:45:42+5:302014-05-10T02:32:16+5:30
अंत्योदय धान्य योजनेअंतर्गत मिळणारे धान्य विकणाऱ्या सरकारी स्वस्त धान्य दुकानदारास पेंढरी पोलिसांनी ११ कट्टे तांदूळ व वाहनासह मंगळवारी रात्री ८ वाजता अटक केली.

५.५ क्विंटल धान्यासह रेशन दुकानदारास अटक
धानोरा : अंत्योदय धान्य योजनेअंतर्गत मिळणारे धान्य विकणार्या सरकारी स्वस्त धान्य दुकानदारास पेंढरी पोलिसांनी ११ कट्टे तांदूळ व वाहनासह मंगळवारी रात्री ८ वाजता अटक केली.
निलकंठ चमाजी येरमे रा. ढोरगट्टा असे अटक करण्यात आलेल्या सरकारी स्वस्त धान्य दुकानदाराचे नाव आहे. निलकंठ येरमे यांनी तांदळाचे ५.५ क्विंटलचे ११ कट्टे एमएच ३३ जी १३५४ क्रमांकाच्या बोलेरो पीकअप गाडीत भरून मंगळवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास काळय़ाबाजारात विकण्यासाठी भरले होते. गावातील नागरिकांना याची चाहूल लागताच संदीप दुगा, सुरेंद्र चौधरी, मंगेश उसेंडी यांनी कट्टे भरलेली गाडी अडविली व पेंढरी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपी निलकंठ येरमे यांना व तांदळाच्या कट्टय़ाचे वाहन ताब्यात घेतले. सदर माल ढोरगट्टा व मासानदी या दोन गावासाठी अंत्योदय योजनेअंतर्गत आला होता. आरोपी निलकंठ येरमे हे गावातील कार्डधारकांना अंत्योदय योजनेचे धान्य वाटप करीत नाही. सरकारी किमतीनुसार धान्याची किंमत ११00 रूपये सांगितली जात आहे. परंतु आरोपी हा धान्य १२ ते १३ हजारात विकणार होता. (तालुका प्रतिनिधी)