काेराेनाच्या काळात रक्त चाचण्यांचा दर कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:37 IST2021-05-13T04:37:31+5:302021-05-13T04:37:31+5:30

रुग्णाला ताप येत असल्यास सीबीसी, सीआरपी या चाचण्या केल्या जातात. याशिवाय लिव्हर संबंधित एलएफटी, किडनीसंबंधी केएफटी चाचणी केली जाते. ...

The rate of blood tests during carnage is constant | काेराेनाच्या काळात रक्त चाचण्यांचा दर कायमच

काेराेनाच्या काळात रक्त चाचण्यांचा दर कायमच

रुग्णाला ताप येत असल्यास सीबीसी, सीआरपी या चाचण्या केल्या जातात. याशिवाय लिव्हर संबंधित एलएफटी, किडनीसंबंधी केएफटी चाचणी केली जाते. याशिवाय मलेरिया, काविळ, टायफाइड आदींसह विविध प्रकारच्या चाचण्या केल्या जातात.

गडचिराेली शहरात अनेक खासगी पॅथाॅलाॅजी लॅब आहेत. तेथील चाचण्यांचे दर गतवर्षी इतकेच कायम आहे. मात्र, चामाेर्शी, आरमाेरीसह तालुकास्तरावरील पॅथाॅलाॅजी सेंटरमध्ये जिल्हास्तरापेक्षा रक्त चाचण्यांचे दर कमी आहेत.

बाॅक्स ......

शासकीय पॅथाॅलाॅजीवरच अधिक भर

गडचिराेली हा आदिवासीबहुल, मागास व गरीब नागरिकांचा जिल्हा आहे. जिल्ह्यात खासगी पॅथाॅलाॅजी सेंटर असले, तरी येथील शासकीय रुग्णालयात औषधाेपचाराच्या चांगल्या सुविधा आहेत. त्यामुळे विविध आजारांच्या रक्त चाचण्या रुग्ण व त्यांचे नातेवाईक शासकीय पॅथाॅलाॅजीतूनच करून घेतात. गडचिराेली येथे जिल्हा सामान्य रुग्णालय व जिल्हा महिला व बाल रूग्णालयातील पॅथाॅलाॅजीमध्ये बऱ्याच रुग्णांच्या चाचण्या केल्या जातात. गडचिराेली जिल्ह्यातील रुग्ण व त्यांचे नातेवाईक शासकीय पॅथाॅलाॅजीवरच अंवलंबून असतात. येथील शासकीय पॅथाॅलाॅजीमध्ये रक्ताची चाचणी सहज हाेत असल्याने रुग्णांचा खासगी पॅथाॅलाॅजीकडे फारसा कल नाही.

बाॅक्स .....

नियंत्रण वाऱ्यावरच

खासगी पॅथाॅलाॅजी संचालकांनी विविध प्रकारच्या रक्तचाचण्यांचे दर किती आकारावे, याबाबत शासनाच्या सूचना आहेत. मात्र, खासगी पॅथाॅलाॅजीतील रक्त चाचण्यांच्या दरावर नियंत्रण ठेवणारी जिल्ह्यात यंत्रणाच नाही. औषध प्रशासन विभागाचा कोणी वालीच नाही. नागपुरात बसून एक प्रभारी निरीक्षक जिल्ह्याचे काम सांभाळतो. आराेग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना कारवाईचे अधिकार असले, तरी अनेक शासकीय रुग्णालयातील डाॅक्टर खासगी प्रॅक्टिस करीत असल्याने या पॅथाॅलाॅजींवर फारसे नियंत्रण नाही. परिणामी, संचालक आपल्या मर्जीनुसार रुग्णांकडून दर आकारत असतात.

बाॅक्स ...

चाचण्या आणि दर

चाचणी लॅब १ लॅब २

सीबीसी २५० ३००

एलएफटी ५०० ५५०

केएफटी ५०० ५५०

मलेरिया १५० २००

कावीळ १०० १५०

टायफाइड ५० ७०

Web Title: The rate of blood tests during carnage is constant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.