पोलीस विभागातर्फे रणरागिणींचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:06 IST2021-03-13T05:06:32+5:302021-03-13T05:06:32+5:30

गडचिरोली पोलीस दल व पोलीस स्थानक सिरोंचा यांच्या संयुक्त विद्यमाने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शासनाच्या कल्याणकारी ...

Ranaraginis felicitated by the Police Department | पोलीस विभागातर्फे रणरागिणींचा सत्कार

पोलीस विभागातर्फे रणरागिणींचा सत्कार

गडचिरोली पोलीस दल व पोलीस स्थानक सिरोंचा यांच्या संयुक्त विद्यमाने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती व मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक अहिरकर, महिला पोलीस उपनिरीक्षक शीतल दविले, स्वामी, अहिरकर, साखरे, मनीषा, भगत यांच्यासह आशार्वकर, अंगणवाडी, आरोग्य सेविका, महिला कर्मचारी उपस्थित होत्या.

देसाईगंज पोलीस स्थानकातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यात अवैध दारू व तंबाखूविरोधात पोलीस विभागाच्या समन्वयातून उत्तम कामगिरी बजावल्याबद्दल देसाईगंज मुक्तिपथ तालुका संघटक भारती उपाध्ये यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रभारी पोलीस अधिकारी बावनकर, एएसआय भोपळे, पोलीस अधिकारी, कर्मचारी व इतर महिला उपस्थित होत्या.

Web Title: Ranaraginis felicitated by the Police Department