अहेरी/देसाईगंज : आजच्या पिढीत व्यसनांचे प्रमाण वाढत आहे. व्यसनमुक्त पिढी घडविण्यासाठी सखींनी पुढाकार घेऊन अहेरी, देसाईगंज येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात व्यसनमुक्त होण्याचा संदेश दिला. लोकमत सखीमंच शाखा अहेरी-आलापल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक धर्मराव कृषी विद्यालयात राखी, थाली सजावट स्पर्धा तसेच वन मिनिट गेम शोचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी आलापल्ली येथे मंतिमंद मुलांना सखींनी राख्या बांधल्या. त्याबरोबरच फळ व अल्पोपहाराचे वाटप केले. अहेरी येथील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिना अडगोपुलवार होत्या. परीक्षक व मार्गदर्शक म्हणून सोनाली मद्देर्लावार, शिल्पा चौधरी, राखी मद्देर्लावार उपस्थित होत्या. सोनाली मद्देर्लावार यांनी धूम्रपान व मादक पदार्थांच्या व्यसनांचे दुष्परिणाम सखींना पटवून सांगितले. यावेळी घेण्यात आलेल्या राखी, थाली सजावट स्पर्धेत प्रथम क्रमांक स्मिता बोमेवार, द्वितीय मंगला निखाडे तर तृतीय क्रमांक मंजुषा गोटेफोडे, नैना घुटे यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. वन मिनिट गेम शो स्पर्धेत प्रथम क्रमांक नलिनी रूकमोडे, द्वितीय भविता गोबाडे, तृतीय क्रमांक मंगला निखाडे यांनी पटकाविले. यावेळी लकी लेडी म्हणून गीता ठेंगळे यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राखी मद्देर्लावार, संचालन रचना बोमकंटीवार तर आभार शिल्पा कोंडावार यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्राचार्य कत्रोजवार व सखीमंचच्या सदस्यांनी सहकार्य केले. लोकमत सखीमंच शाखा देसाईगंजच्यावतीने स्थानिक नगर परिषद कन्या शाळेत डिश डेकोरेशन व राखी मेकींग स्पर्धा तसेच धूम्रपान निर्मूलन कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी डॉ. मिनाक्षी बन्सोड, प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापिका अनिता मुलकलवार, तालुका संयोजिका कल्पना कापसे उपस्थित होत्या. डिश डेकोरेशन स्पर्धेत प्रथम क्रमांक वनिता बडवाईक, द्वितीय सुनंदा खेडीक यांनी पटकाविले. तर प्रोत्साहनपर बक्षीस दिशाली चावके यांनी पटकाविले. राखी मेकींग स्पर्धेत प्रथम क्रमांक सुनंदा खेडीक, द्वितीय दिशाली चावके, प्रोत्साहनपर बक्षीस अल्का कुबडे यांनी पटकाविले. यावेळी डॉ. मिनाक्षी बन्सोड यांनी धूम्रपान निर्मूलनासाठी सखींनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. स्पर्धेचे निरिक्षण सुनेत्रा कोलते, जोग यांनी केले. संचालन किरण मेश्राम तर आभार निलिमा माडुलवार यांनी मानले. सुप्रीया मैंद, जया वंजारी, नेहा डोंगरवार, अस्मीता लायनकर, किरण नगरकर, सोमवती लंजे, विना मानवटकर, कुमरे, मंजुषा लांडगे यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)
राखी, थाली सजावट स्पर्धा उत्साहात
By admin | Updated: August 21, 2014 23:52 IST