नर्सिंग प्रशिक्षणातून आराेग्य सेवेचा दर्जा उंचवावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:38 IST2021-05-08T04:38:30+5:302021-05-08T04:38:30+5:30
येथील तालुका आरोग्याधिकारी कार्यालयात पार पडलेल्या मास्क वितरण कार्यक्रमाला नवजीवन नर्सिंग कॉलेजचे संस्थापक भीमराव गाेवर्धन, डाॅ. भूषण चाैधरी, डाॅ. ...

नर्सिंग प्रशिक्षणातून आराेग्य सेवेचा दर्जा उंचवावा
येथील तालुका आरोग्याधिकारी कार्यालयात पार पडलेल्या मास्क वितरण कार्यक्रमाला नवजीवन नर्सिंग कॉलेजचे संस्थापक भीमराव गाेवर्धन, डाॅ. भूषण चाैधरी, डाॅ. महेंद्र जामगडे, आराेग्य विस्तार अधिकारी साेनटक्के उपस्थित हाेते.
डाॅ. मेश्राम म्हणाले, संस्थेच्या प्रशिक्षणार्थी भामरागड तालुक्यात अतिशय चांगल्या प्रकारे सेवा देत आहेत. रुग्णसेवेसोबत त्या उत्कृष्ट आरोग्य शिक्षण देत आहेत. त्यांच्या वर्तनातून सामाजिक बांधीलकी निदर्शनास येते. कर्मचाऱ्यांनी कर्तव्य पार पडताना सामाजिक बांधीलकी जोपासली, इतरांच्या अडचणींत, दुःखात सहभागी झाले तर आत्मसमाधानासोबत विश्वासाची भावना निर्माण होईल.
याप्रसंगी गोवर्धन म्हणाले, योजनेची यशस्विता लोकसहभागावर अवलंबून आहे. ज्याच्यासाठी ती आहे त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या बाैद्धिक पातळीवर जाऊन योग्यरीत्या समजावून सांगितले तर ती त्यांना पटते व त्यांचा सहभाग वाढताे. जनतेशी समरस होऊन, त्यांच्यात मिसळून हे साध्य करता येते.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते गोवर्धन यांचा सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे, संस्थेद्वारे ग्रामीण भागात जनजागृती केली जात आहे. तसेच मास्क वितरण, गरजू रुग्णांना आवश्यक मदत केली जात आहे.
===Photopath===
070521\07gad_2_07052021_30.jpg
===Caption===
संस्थेचे पदाधिकारी गाेवर्धन यांचा सत्कार करताना मान्यवर.