गडचिरोलीत मुसळधार पाऊस; धानाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 12:50 PM2020-02-08T12:50:29+5:302020-02-08T12:50:52+5:30

शुक्रवारी मध्यरात्रीपासून जिल्ह्यात रिमझिम पाऊस सुरू आहे. ढगाळ वातावरण व हवेतील गारठ्यामुळे आधारभूत धानखरेदी केंद्रांना मोठा फटका बसला आहे.

rains in Gadchiroli; Hit the paddy | गडचिरोलीत मुसळधार पाऊस; धानाला फटका

गडचिरोलीत मुसळधार पाऊस; धानाला फटका

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: शुक्रवारी मध्यरात्रीपासून जिल्ह्यात रिमझिम पाऊस सुरू आहे. ढगाळ वातावरण व हवेतील गारठ्यामुळे आधारभूत धानखरेदी केंद्रांना मोठा फटका बसला आहे.
साठवणूक केलेल्या धानाच्या पोत्यांमध्ये पाणी शिरल्याने धान ओले होऊन त्याला कोंब फुटल्याचे दिसत आहे. या धानाचा मोठा फटका शेतकऱ्यांना व खरेदी संस्थांना बसला आहे. संस्थांकडे धान झाकण्यासाठी पुरेशा ताडपत्र्या नाहीत. ज्या आहेत त्यांना अनेक छिद्रे आहेत. योग्य ताडपत्र् या मिळाव्यात म्हणून केलेल्या आंदोलनात तीन दिवसात ताडपत्री देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्याची पूर्तता अद्याप झालेली नाही. चणा, जवस, तूर या कडधान्य पिकांनाही फटका बसला असून, त्यांच्यावर खोडकिडा व इतर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. तसेच विटा उद्योगालाही या पावसाचा फटका बसला आहे.

Web Title: rains in Gadchiroli; Hit the paddy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस